कोल्हापुरातील निगवे दुमाला येथे विहिरीत बुडून तरूणाचा मृत्यू  

young boy dead in kolhapur shiroli dumala
young boy dead in kolhapur shiroli dumala

भुये (जि. कोल्हापूर) : निगवे दुमाला ( ता. करवीर ) येथील युवकाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. प्रतिम प्रकाश पाखरे ( वय 24) असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी, एक मार्च रोजी सकाळी 9 वाजता प्रतिम घरातून कामावर जातो असे सांगून निघून गेला होता. तो परत आलाच नाही. त्यामुळे दोन मार्च रोजी करवीर पोलिस ठाण्यात कुटुंबीयांनी मुलगा हरविल्याची तक्रार दिली. दरम्यान शेजारी सहदेव चौगले व दिपक पाटील यांची सोनतळीलगत असलेल्या विहीरीत मुलाचे प्रेत तरंगत असलेले त्यांना दिसले. त्यांनी प्रेत विहिरीतून बाहेर काढले. करवीर पोलिसानी पंचनामा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. प्रतिमचे चार महिण्यापूर्वीच लग्न झाले होते.  पुढील तपास करवीर पोलिस करत आहे.  


संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com