सामान्यांच्या प्रश्‍नांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये; योगीराज गायकवाड

सकाळ वृत्तसेवा | Friday, 6 November 2020

योगीराज गायकवाड; पक्ष सोपवेल ते काम करणार

बांबवडे (कोल्हापूर) : शाहूवाडी तालुक्‍यातील सर्वसामान्य लोकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसवर विश्वास असल्याने पक्षात प्रवेश केल्याची माहिती आज युवा नेते योगीराज गायकवाड यांनी दिली. येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ते म्हणाले, की लोकनेते आमदार संजयसिंह यांनी लोककल्याणकारी दृष्टिकोन समोर ठेवून लोकांची कामे केली. त्यांच्या कार्याचा वारसा जपण्यासाठी प्रयत्न करीत आहे. तालुक्‍यात संजयसिंह गायकवाड यांनी मोठमोठे प्रकल्प आणले. त्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या हाताला काम मिळाले. यातून हजारो कार्यकर्ते जोडले गेले.

हेही वाचा- Success Story : दहा गुंठ्यांत पानमळा पिकवून झाला लखपती -

मंत्री मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष जी जबाबदारी सोपवेल ती पार पाडणार आहे. दयानंद कांबळे उपस्थित होते. संदीप खेमाडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. उत्तम पाटील यांनी आभार मानले.

संपादन - अर्चना बनगे