भारिच ! जंगलातील प्लास्टिकमुक्तीसाठी 'ही' मंडळी देतात आठवड्याचा एक दिवस...

The youth of Pohale offer one day a week to get rid of plastic in the forest
The youth of Pohale offer one day a week to get rid of plastic in the forest

जोतिबा डोंगर - आठवड्यातील एक दिवस आपल्या कामातून चार पाच तास वेळ काढायचा आणि थेट जंगल डोंगर, दऱ्या, पठारे गाठायची. तेथे पडलेला सर्व प्लास्टिक कचरा गोळा करायचा. तो एकत्र करून पोत्यात भरायचा आणि गावात आणून भंगारवाल्यांना मोफत द्यायचा. आपल्या भागातील निसर्ग वाचला पाहिजे.त्याचे संर्वधन व्हायला हवं यासाठी पोहाळे तर्फ आळते ता.पन्हाळा या गावातील पंधरा - वीस निसर्ग मित्र तरुण हे काम आगळं वेगळे काम करीत आहेत.

कोल्हापूर पासून चौदा पंधरा किलोमीटर अंतरापासून पुढे गेले पोहाळ - गिरोली, ज्योतिबा डोंगर, सादळे - मादळे या भागातील डोंगर पठारे लागतात. या ठिकाणी हा परिसर हिरवागार सौंदर्याने नटलेला आहे. या परिसरातून थेट संपूर्ण कोल्हापूरचे दर्शन होते तसेच पन्हाळागड, वारणा, कोडोली परिसरही स्पष्ट दिसतो.

या डोंगर पठारावर शनिवार रविवारच्या सुट्टीच्या दिवशी फोटोग्राफी, स्नेहभोजन, तसेच काही तळीरामांची ही गर्दी होते. येणारे पर्यटक प्लास्टिक कचरा टाकून जातात. बाटल्या फोडून काचा करतात. त्यामुळे दिवसेंदिवस हा परिसर प्लास्टिकमय होत आहे. या परिसरातील निसर्गास बाधा येऊ लागल्याने येथील पर्यावरण निसर्गप्रेमी तरूणांनी चंग बांधला आणि निदान आठवड्यातील एक दिवस खास निसर्गासाठा देण्याचा संकल्प केला आहे.

रविवारी किंवा सुटीच्या दिवशी हे तरुण थेट या डोंगर पठारावर जातात. विखुरलेला सर्व प्लास्टिक, कचरा पोत्यात गोळा करतात आणि तो गावात आणतात. या डोंगर पठारावर आलेल्या पर्यटकांना हे तरुण सांगतात की, 'हा निसर्ग आमचा आहे. त्याला बाधक असे वर्तन करू नका.येथे या खेळा, बागडा,आनंद घ्या पण पर्यावरणाला बांधा पोहचेल असे प्रकार करू नका'.

या भागात गेल्या चार पाच वर्षापासून निसर्ग संवर्धनाची चळवळ तरुण वर्ग, शिक्षक, निसर्गप्रेमी यांनी सुरू केली असून जनजागृती करण्याचे काम केले आहे. दरवर्षी हे निसर्ग मित्र तरुण जुलै-ऑगस्ट महिन्यात नेचर वॉक सारखे उपक्रम घेत असतात. प्रसिद्ध निसर्ग अभ्यासक, वनस्पती तज्ञ डॉ.मधूकर बाचूलकर, डॉ.वाली यांना थेट या परिसरात आणतात व येथील निसर्ग पर्यावरण, संवर्धन विविध झाडे, प्राणी पशू पक्षी यांची माहिती घेतात. यापूर्वी त्यांनी निसर्ग मित्र अनिल चौगले यांना आणून सर्प विषयक समज गैर समज हा कार्यक्रम घेतला. पक्षीमित्र दिलीप पाटील यांना आणून या भागात असणारे १०८ प्रकारच्या विविध जातीच्या पक्षांचे निरिक्षण त्यांनी केले आहे.

सुरेश बेनाडे, चंद्रकांत निकाडे, भिवाजी काटकर, शिवाजी मिसाळ, बाबासो गुरव, केदारी बोरचाटे, नानासो पाटील, अमोल बोरचाटे, संग्राम गायकवाड, धनाजी पोवार, रमेश बोरचाटे, के.एन.पाटील, बळी मिसाळ, सूरज मोटे,  महेश चौगले, संग्राम साळोखे, सुनिल साळोखे तसेच परिसरातील इतर निसर्गमित्र या उपक्रमासाठी परिश्रम घेत आहे .
 

या परिसरातील निसर्ग अबाधीत राखण्याची सर्वांची जबाबदारी आहे.पर्यटकांनी सुध्दा प्लास्टिक कचरा करू नये. आठवड्याला तीन - चार पोती कचरा निघतो. माणसांप्रमाणे पशुपक्षी ही जगला पाहिजे - शिवाजी मिसाळ

संपादन - मतीन शेख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com