आमदार कल्याणशेट्टींनी दिला "दक्षिण' मधील शेतकऱ्यांना धीर 

Sachin kalyanshetti.jpg
Sachin kalyanshetti.jpg

द. सोलापूर ः निसर्गाच्या प्रकोपामुळे यंदा आपल्या भागात प्रचंड नुकसान झाले आहे. हे नुकसान न भरून येणारे झाले आहे तरीही खचू नका व हिंमतीने रहा असा धीर दिला. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी तांदुळवाडी, कासेगाव व मुस्ती (ता.दक्षिण सोलापूर) येथील शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधला. 

दक्षिण सोलापूर तालुक्‍याच्या बोरामणी महसूल मंडलातील तांदुळवाडी, मुस्ती, कासेगाव, वडजी, पिंजारवाडी या गावात पावसामुळे आतोनात नुकसान झाले आहे. दोन दिवसात 185 मिमिपेक्षा अदिक पाऊस झाला त्यामुळे शेकडो हेक्‍टर क्षेत्रात पाणीच होते. अनेक घरांची पडझड झाली असून सोयाबीन, कांदा, तूर, उडीद, मूग, ऊस व द्राक्ष आदीसह अन्य पिकांची प्रचंड नासाडी झाली आहे. त्यामुळे शेतकरी पुरता खचून गेला आहे. आमदार कल्याणशेट्टी यांनी आज या भागातील नुकसानीची पाहणी करत शेतकऱ्यांना धीर दिला व नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले. यावेळी तहसीलदार अमोल कुंभार, गटविकास अधिकारी राहुल देसाई, जिल्हा परिषद सदस्य अण्णाराव बाराचारी, द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक शंकर येणगुरे व बालाजी चौगुले, तांदुळवाडीचे सरपंच सिध्दाराम हेले, उपसरपंच मंजीत माने, कासेगावचे सरपंच सुरेखा काळे व उपसरपंच शंकर वाडकर, मधुकर चिवरे, धनंजय गाढवे, माजी सरपंच सुरेश लांडे, सुधाकर पाटोळे, सुनील स्वामी, विजय काळे, सोमनाथ सुतार, विक्रांत माताटे, प्रकाश हेले, विश्वजीत हेले, विजयकुमार हेले, नवनाथ मेरू, चंद्रकांत चौधरी, बाबुराव कोरे, राम चौगुले, चंद्रकांत चव्हाण, निशिकांत पाटील, राम हुडकर, प्रविण चौगुले, ज्ञानेश्वर कदम, अल्लाउद्दीन शेख, गुरुदास काटकर, ओंकार येणगुरे, विलास सुरवसे, केदार ढेकळे आदीसह शेतकरी उपस्थित होते. 

कासेगाव, तांदुळवाडी व मुस्ती गावात पाऊस जास्त झाल्याने अनेकांच्या घरात पाणी घुसले होते. अनेक घरांची पडझड झाल्याने घराचे तसेच पिकासह माती वाहून गेल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले. निसर्गाच्या या प्रकोपामध्ये अक्षरशः सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. हरणा नदीला महापूर आला होता. त्यामुळे शेतीचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले. हे नुकसान न भरून येणारे असले तरी यामुळे खचून जाऊ नका. हिंमतीने रहा असा धीर आमदार कल्याणशेट्टी यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिला. तसेच लवकरात लवकर निर्णय घेऊन नुकसान भरपाईसाठी सरकार दरबारी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासनही दिले. 


संपादन : अरविंद मोटे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com