जनता बॅंकेच्या 17 संचालकांसाठी 59 जणांचे 122 अर्ज ! 'असा' आहे नियोजित कार्यक्रम

तात्या लांडगे
Wednesday, 10 February 2021

निवडणुकीचा असा आहे कार्यक्रम
अर्जांची छाननी : 12 फेब्रुवारी
वैध अर्जांची यादी प्रसिध्द : 15 फेब्रुवारी
अर्ज माघार : 1 मार्च
अंतिम उमेदवार यादी : 2 मार्च
मतदान : 14 मार्च
मतमोजणी : 16 मार्च

सोलापूर : जनता सहकारी बॅंक, सोलापूरच्या संचालक मंडळाची निवडणूक लागली आहे. 17 संचालकांसाठी शेवटच्या दिवसापर्यंत 81 जणांचे 122 अर्ज दाखल झाले आहेत. आता शुक्रवारी (ता. 12) दाखल अर्जांची छाननी होणार असून 1 मार्च रोजी अर्ज माघार घेता येणार आहे.

 

निवडणुकीचा असा आहे कार्यक्रम
अर्जांची छाननी : 12 फेब्रुवारी
वैध अर्जांची यादी प्रसिध्द : 15 फेब्रुवारी
अर्ज माघार : 1 मार्च
अंतिम उमेदवार यादी : 2 मार्च
मतदान : 14 मार्च
मतमोजणी : 16 मार्च

जनता सहकारी बॅंकेवर सध्या अध्यक्ष म्हणून किशोर देशपांडे तर उपाध्यक्षपदी वरदराज बंग हे आहेत. तर संचालकांमध्ये महेश अंदेली, प्रा. गजानन धरणे, भुपती तामलेटी, ऍड. प्रदिपसिंह रजपूत, सीए सुहास त्रिगोंदेकर, सुहासिनी शहा, डॉ. किरण पाठक, प्रमोद भुतडा यांच्यासह अन्य सात संचालकांचाही समावेश होता. कोरोनानंतर आता सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा पहिला टप्पा सुरु झाला आहे. जनता बॅंकेच्या संचालकपदासाठी अर्ज करण्याचा आज शेवटचा (ता. 10) दिवस होता. 8 फेब्रुवारीला पहिल्या दिवशी 13 अर्ज दाखल केले होते. तर 9 फेब्रुवारीला 50 आणि 10 फेब्रुवारीला 59 असे एकूण 122 अर्ज दाखल झाले आहेत. 25 किलोमीटरच्या आतील रहिवासी असलेल्या सभासदांमधून संचालक निवडीसाठी 76 तर 25 किलोमीटरबाहेरील सदस्यांमधून संचालक निवडण्यासाठी 21 जणांनी अर्ज केले आहेत. अनुसूचित जाती-जमाती मतदार संघातून 16 तर महिला राखीव मतदार संघातून नऊ जणांनी अर्ज केले आहेत.

इच्छूकांची यादी आज होईल प्रसिध्द
जनता सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळ निवडीच्या अनुषंगाने अर्ज दाखल करण्याची आज शेवटची मुदत होती. अर्जदार इच्छूकांची यादी उद्या (ता. 11) प्रसिध्द केली जाणार आहे. 14 मार्च रोजी मतदान असून 16 मार्चला मतमोजणी होईल.
- कुंदन भोळे, जिल्हा उपनिबंधक, सोलापूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 122 applications for 17 directors of Janata Bank! This is the planned election program