सोलापूरच्या ग्रामीण भागात 133 नवे कोरोनाबाधित रुग्ण

सकाळ वृत्तसेवा
Monday, 26 October 2020

तालुकानिहाय बाधिताची संख्या कंसात मृत्यू
अक्कलकोट- 1072 (67), बार्शी- 5400 (175), करमाळा- 2012 (46), माढा- 3106 (102), माळशिरस- 5214 (106), मंगळवेढा- 1379 (35), मोहोळ- 1404 (75), उत्तर सोलापूर- 719 (35), पंढरपूर- 5584 (168), सांगोला- 2388 (36), दक्षिण सोलापूर- 1406 (44), एकूण- 29984 (889).

सोलापूर ः सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आज 133 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आज केवळ 775 जणांची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 642 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 133 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोनामुक्त झाल्याने आज 151 जणांना घरी सोडण्यात आले. त्याचबरोबर कोरोनामुळे आज केवळ चार जणांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 30 हजाराच्या उंबरठ्यावर येऊन पोचली आहे. आजअखेर 29 हजार 984 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. याशिवाय 889 जण कोरोनामुळे मृत्युमुखी पडले आहेत. कोरोनाग्रस्त झाल्याने दोन हजार 935 जण अद्यापही वेगवेगळ्या दवाखान्यांमध्ये उपचार घेत आहेत. याशिवाय 26 हजार 160 जणांना कोरोना मुक्त झाल्याने घरी सोडले आहे. आज नेवरे (ता. माळशिरस) येथील 70 वर्षीय पुरुष, सरकोली (ता. पंढरपूर) येथील 65 वर्षाची महिला, करकंब (ता. पंढरपूर) येथील 93 वर्षाचे पुरुष, सदाशिवनगर (ता. माळशिरस) येथील 65 वर्षाच्या पुरुषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

"उत्तर-दक्षिण'मध्ये एकही रुग्ण नाही
सोलापूर शहराच्या लगत उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर हे दोन तालुके आहेत. मात्र, या दोन्ही तालुक्‍यांमध्ये आज एकही नव्याने कोरोनाबाधित रुग्ण सापडला नाही.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 133 new coronavirus patients in rural Solapur