BREAKING....सोलापूर महापालिकेस 14.22 कोटींचा निधी 

विजयकुमार सोनवणे
मंगळवार, 26 मे 2020

पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार राज्यातील 387 स्थानिक स्वराज्य संस्थांना पहिल्या हप्त्यांतर्गत 305 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. पात्र ड वर्ग महापालिका, नगर परिषदा, नगर पंचायती व कटक मंडळांना हा निधी वितरीत केला जाणार आहे.

सोलापूर : पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार राज्य शासनाने सोलापूर महापालिकेस 14 कोटी 22 लाख रुपयांचा हप्ता मंजूर केला आहे. याशिवाय, सोलापूर जिल्ह्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतींनाही निधी मंजूर करण्यात आला आहे. 

पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार राज्यातील 387 स्थानिक स्वराज्य संस्थांना पहिल्या हप्त्यांतर्गत 305 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. पात्र ड वर्ग महापालिका, नगर परिषदा, नगर पंचायती व कटक मंडळांना हा निधी वितरीत केला जाणार आहे. लोकसंख्या आणि क्षेत्रफळाच्या निकषाआधारे ही रक्कम मंजूर करण्यात आली आहे. 

मंजूर करण्यात आलेला निधी तत्काळ संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना आरटीजीएसच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचे आदेश नगरविकास विभागाने दिले आहेत. या निधीचा विनियोग कसा करायचा याबाबत स्वतंत्र आदेशाद्वारे कळविले जाणार आहे. केंद्र शासनाकडून हे अनुदान प्राप्त झाले असून तो राज्य शासनामार्फत राज्यातील पात्र स्थानिक स्वराज्य संस्थांना वितरीत केला जाणार आहे. 

मंजूर निधी रुपयांत या प्रमाणे - सोलापूर महापालिका (14.22 कोटी), बार्शी (1.83कोटी), पंढरपूर (1.47कोटी), करमाळा (34.83लाख), सांगोला (76.28लाख), अक्कलकोट (58.71लाख), मंगळवेढा (31.48लाख), मैंदर्गी (18.33), दुधनी (16.54लाख), कुर्डुवाडी (34.49), माळशिरस (45.63लाख),मोहोळ (56.33),माढा (21.78).
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 14.22 crore fund to Solapur Municipal Corporation