सोलापूरच्या ग्रामीण भागात 146 नवे कोरोनाबाधित रुग्ण 

सोलापूरच्या ग्रामीण भागात 146 नवे कोरोनाबाधित रुग्ण 

सोलापूर ः सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आज नव्याने 146 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आज एक हजार 450 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी एक हजार 304 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 146 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्याचबरोबर कोरोनामुळे आज सात जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुक्त झाल्याने आज 182 जणांना घरी सोडले आहे. 
सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आत्तापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या 29 हजार 571 एवढी झाली आहे. कोरोनाग्रस्त असल्यामुळे अद्यापही तीन हजार 69 जण वेगवेगळ्या दवाखान्यांमध्ये उपचार घेत आहेत. कोरोनामुळे आत्तापर्यंत 869 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुक्त झाल्याने 25 हजार 633 जणांना घरी सोडण्यात आले आहे. आज कौठाळी (ता. पंढरपूर) येथील 75 वर्षांचे पुरुष, देगाव (ता. पंढरपूर) येथील 70 वर्षाची महिला, चारे (ता. बार्शी) येथील 60 वर्षाचे पुरुष, कालिकादेवी चौक पंढरपूर येथील 75 वर्षाची महिला, सुतार नेट बार्शी येथील 65 व 66 वर्षाचे पुरुष, टाकळी रोड पंढरपूर येथील 80 वर्षाचे पुरुष यांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com