पुण्याहून आपल्या घराकडे चालत जाणारे 15 जण ताब्यात 

15 detained by Solapur District Police
15 detained by Solapur District Police

नातेपुते (सोलापूर) : पुण्याहून आपल्या घराकडे चालत जाणाऱ्या 15 मजुरांना आज नातेपुते पोलिसांनी नातेपुते शहरात पकडले असून त्यांना महसूल खात्याच्या ताब्यात दिले आहे. या सर्वांची आरोग्य तपासणी करून विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे, अशी माहिती गावकामगार तलाठी प्रभाकर उन्हाळे यांनी दिली. 
पुणे परिसरातील वाघोली येथून कर्नाटकातील विजयपूर, रायचूर, बागलकोट या जिल्ह्यांतील सेंट्रिंग काम करणारे मजूर सोमवारी (ता. 6) आपल्या गावी जाण्यासाठी निघाले आहेत. या 15 जणांमध्ये एक, पाच, सहा वयाची तीन मुले, दोन महिला, 10 पुरुष असे एकूण 15 जण मागील चार दिवसांपासून रात्रंदिवस घराच्या दिशेने चालत आहेत. त्यांनी पुणे शहर, पुणे ग्रामीण, सातारा ग्रामीण या सर्व पोलिसांच्या नजरा चुकवत आपल्या गावाचा रस्ता धरला होता. नातेपुते येथे सकाळी साडेदहाच्या दरम्यान सहायक पोलिस निरीक्षक युवराज खाडे यांनी शहरात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून या वाटसरूंना पाहिले आणि पुणे-पंढरपूर रोडवर जाऊन ताब्यात घेतले. 
या लोकांनी कोरोनाच्या भीतीने तसेच पुण्यात राहण्याची, जेवणाची सोय नसल्याने घरचा रस्ता धरला होता. या सर्वांना पोलिस खात्याने महसूल खात्याच्या ताब्यात दिले असून गावकामगार तलाठी प्रभाकर उन्हाळे यांनी या सर्वांची ग्रामीण रुग्णालयात नेऊन तपासणी केली व विलगीकरण कक्षामध्ये या सर्वांना भोजन दिले आहे. लॉकडाउन संपेपर्यंत त्यांना अकलूजला ठेवण्यात येणार आहे. 
अशाच प्रकारचे प्रवासी पुणे व सातारा जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात येऊ नयेत म्हणून पोलिस प्रशासन, महसूल खाते व स्थानिक ग्रामस्थ दक्ष आहेत. हे मजूर भुंकल दंडी (ता. देवदुर्ग, जि. रायचूर) तसेच संगम, बागलकोट व शिंदगी, बसवन (जि. विजयपूर) येथील आहेत. या सर्वांची आरोग्य तपासणी करण्यात आलेली आहे. तरीही त्यांना जिल्हाबंदी उठेपर्यंत येथे ठेवण्यात येणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com