सोलापूर ग्रामीणमध्ये 16 जणांचा मृत्यू, 454 नवे बाधित : माळशिरसमध्ये 150 रुग्णांची भर 

corona
corona

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विशेषतः बार्शी, पंढरपूर, माळशिरस व माढा या तालुक्‍यात कोरोनाबाधित रुग्णांची दिवसेंदिवस वाढणारी संख्या ही जिल्ह्याची चिंता वाढवू लागली आहे. मंगळवारी रात्री बारा वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या कोरोना चाचणी अहवालानुसार 454 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. 16 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 404 जण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. 

ग्रामीण भागातील बाधितांची संख्या आता 22 हजार 167 झाली असून 618 जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रुग्णालयात सध्या 6 हजार 940 जणांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 14 हजार 575 जण कोरोना मुक्त झाले आहेत. आजच्या अहवालानुसार अक्कलकोट तालुक्‍यात एकाही नव्या बाधिताची भर पडली नाही. परंतु यापूर्वी आढळलेल्या कोरोना बाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

आजच्या अहवालानूसार माळशिरस तालुक्‍यात सर्वाधिक 150 नव्या बाधितांची भर पडली असून या तालुक्‍यातील चार जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पंढरपूर तालुक्‍यात 75 नवे बाधित रुग्ण आढळले असून या तालुक्‍यातीलही चार जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 

मोहोळ तालुक्‍याच्या ग्रामीण भागात आज नवीन सहा कोरोना बाधित रुग्ण आढळले असून दोन जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. माढा तालुक्‍यात 40 नवे कोरोना बाधित आढळले असून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. आज मृत पावलेल्या व्यक्तीमध्ये अक्कलकोट तालुक्‍यातील केगाव बु. येथील 48 वर्षिय पुरुष, माळशिरसमधील दत्तनगर येथील 65 वर्षिय पुरुष, माळशिरस तालुक्‍यातील धर्मपुरी येथील 80 वर्षीय महिला, दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील मुळेगाव तांडा येथील 54 वर्षिय पुरुष, दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील दोड्डी येथील साठ वर्षिय पुरुष, माढा तालुक्‍यातील टेंभुर्णी येथील 36 वर्षिय पुरुष, माळशिरस तालुक्‍यातील अकलूज येथील 63 वर्षिय पुरुष, पंढरपुरातील कडबे गल्ली येथील 57 वर्षिय पुरुष, पंढरपुरातील गोकुळ नगर येथील 65 वर्षिय पुरुष, करमाळा तालुक्‍यातील पांगरी येथील 68 वर्षिय पुरुष, मोहोळ तालुक्‍यातील चिखली येथील 35 वर्षीय पुरुष, पंढरपुरातील संग्राम चौकातील 45 वर्षीय महिला, मोहोळ तालुक्‍यातील सारोळे येथील 67 वर्षिय पुरुष, पंढरपूर तालुक्‍यातील शेटफळे येथील 65 वर्षिय पुरुष, माळशिरस तालुक्‍यातील माळीनगर येथील 61 वर्षीय पुरुष, बार्शीतील ब्राह्मण गल्ली येथील 76 वर्षे पुरुष अशा 16 जणांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com