मोहोळमधील क्रांतीनगर, वाळूज, कुरुलसह ग्रामीण भागात आज आढळले 18 कोरोनाबाधित 

प्रमोद बोडके
Saturday, 20 June 2020

सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 99 कोरोनाबाधित व्यक्तींवर सध्या दवाखान्यात उपचार सुरू आहेत. 69 व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत. ग्रामीण भागातील अकरा व्यक्तींचा आत्तापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात (महापालिका क्षेत्र वगळून) आज नव्याने अठरा कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामध्ये 11 पुरुष व सात महिलांचा समावेश आहे. आज दुपारी 4 वाजेपर्यंत कोरोना चाचणीचे 239 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 221 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 18 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 

आज सापडलेल्या 18 कोरोना बाधित रुग्णांमुळे सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 179 झाली आहे. मोहोळ शहरातील क्रांतीनगर येथील एक पुरुष, मोहोळ तालुक्‍यातील वाळूज येथील एक महिला, दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील होटगी येथील एक पुरुष, अक्कलकोट तालुक्‍यातील गुरववाडी येथील एक पुरुष, दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील कर्देहळ्ळी येथील एक पुरुष, मोहोळ तालुक्‍यातील कुरुल येथील एक पुरुष, अक्कलकोट शहरातील कारंजा चौक होटकर गल्ली येथील एक पुरुष, दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील मुळेगाव पारधी वस्ती येथील दोन पुरुष व चार महिला, दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील कुंभारी येथील नवीन विडी घरकुल येथील एक महिला, अक्कलकोट तालुक्‍यातील करजगी येथील एक पुरुष, बार्शी तालुक्‍यातील वैराग येथील एक पुरुष व एक महिला, बार्शी शहरातील गुंड प्लॉट येथील एक पुरुष अशा नवीन अठरा रुग्णांचा समावेश आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 18 corona-infected were found today in rural areas including Krantinagar, Waluj, Kurul in Mohol