एका रुग्णामागे आता 30 संशयितांची टेस्ट !...तर दहा दिवस इन्स्टिट्यूशनल क्‍वारंटाईनमध्येच मुक्‍काम

1Sakal_20_2836_29_2.jpg
1Sakal_20_2836_29_2.jpg

सोलापूर : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने आता एका पॉझिटिव्ह रुग्णामागे त्याच्या थेट संपर्कातील किमान 20 ते जास्तीत जास्त 30 संशयितांची टेस्ट केली जाणार आहे. दुसरीकडे रुग्णासह त्याच्या संपर्कातील संशयितांना होम आयसोलेशन नव्हे तर इन्स्टिट्युशनल क्‍वारंटाईन करण्याचा निर्णय सोलापूरच्या प्रशासनाने घेतला आहे. संशयितांची आता रॅपिड ऍन्टीजन नाही तर आरटीपीसीआर टेस्ट केली जाणार आहे.

रुग्ण तथा संशयितांचे नियोजन

  • रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे, परंतु लक्षणे नाहीत अथवा सौम्य लक्षणे असलेल्यांना 10 दिवस कोविड केअर सेंटरमध्ये राहावे लागेल
  • रुग्णाच्या थेट संपर्कातील संशयितांचा कोरोना टेस्टचा रिपोर्ट येईपर्यंत त्यांना कोविड केअर सेंटरमध्येच ठेवले जाईल
  • कोरोना टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरही संबंधित संशयितांमध्ये लक्षणे आढळल्यास त्याला इन्स्टिट्युशनल क्‍वारंटाईनमध्ये राहावे लागणार
  • ऑक्‍सिजन लेव्हल 95 ते 100 असून त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असलेल्यास ऑक्‍सिजनची गरज आहे, परंतु दम लागत नाही, अशांना कोविड केअर हेल्थ सेंटरमध्ये ठेवले जाईल
  • ज्यांची ऑक्‍सिजन लेव्हल 95 पेक्षा कमी आहे, ज्यांना ऑक्‍सिजन, व्हेंटिलेटरची गरज लागेल, त्यांना डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये ठेवले जाणार

सोलापूर शहरात आज (रविवारी) 560 रिपोर्टमध्ये 30 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत, तर ग्रामीणमध्ये एक हजार 572 संशयितांमध्ये 47 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून कुर्डुवाडीतील 78 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढू नये, म्हणून आता दररोज सरासरी अडीच ते तीन हजार संशयितांची टेस्ट केली जाणार आहे. राज्यभरातील कोरोनाची स्थिती पाहता महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील रुग्णालयांना कोरोना रुग्णांसाठी राखीव बेड उपलब्ध करुन देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. उद्या (सोमवारी) त्यासंदर्भात तालुका आरोग्याधिकारी व कोरोना काळात उत्कृष्ट काम केलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. त्यात कोरोनाला रोखण्याच्या अनुषंगाने स्टॅण्डर्ड ऑपरेटिंग सिस्टिम उभारली जाणार आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी आणि माझे गाव कोरोनामुक्‍त गाव या दोन्ही अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी आशासेविका, अंगणवाडी सेविकांची मदत घेतली जाणार असून त्यांना प्रत्येकी 50 घरांतील सदस्यांचे स्क्रिनिंग करण्याचे उद्दिष्टे दिले जाणार आहे.


कोरोनाला रोखण्यासाठी केले ठोस नियोजन
कोरोना वाढणार नाही, यादृष्टीने खबरदारी घेत आता जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या आदेशानुसार संशयितांना होम आयसोलशेनऐवजी इन्स्टिट्युशनल क्‍वारंटाईनमध्ये दहा दिवसांसाठी ठेवले जाणार आहे. तर एका रुग्णांमागे त्याच्या थेट संपर्कातील 20 ते 30 संशयितांची कोरोना टेस्ट केली जाणार आहे.
- डॉ. प्रदिप ढेले, जिल्हा शल्यचिकित्सक, सोलापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com