
तालुकानिहाय बाधित रुग्णांची संख्या
अक्कलकोट-599, बार्शी-1570, करमाळा-327, माढा-532, माळशिरस-638, मंगळवेढा-280, मोहोळ-458, उत्तर सोलापूर-476, पंढरपूर 1734, सांगोला-308, दक्षिण सोलापूर-782, एकूण-7704
सोलापूर ः जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने आज देण्यात आलेल्या जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या अहवालामध्ये 314 नवे कोरोनाबाधित रुगण आढळून आले आहेत. त्याचबरोबर आज आठ जणांचा बळी कोरोनाने घेतला आहे. आज नव्याने आढळलेल्या नव्या रुग्णांमुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या सत हजार 704 एवढी झाली आहे.
आज कोरोनामुळे माळशिरस तालुक्यातील यशवंतनगर येथील 60 वर्षीय पुरुष, उघडेवाडी येथील 55 वर्षाची महिला, नान्नज (ता. उत्तर सोलापूर) येथील 69 वर्षीय महिला, मोडनिंब (ता. माढा) येथील 80 वर्षीय पुरुष, करमाळ्याच्या सुतार गल्लीतील 74 वर्षाचे पुरुष, लव्हे येथील 65 वर्षाचे पुरुष, नागणसूर (ता. अक्कलकोट) येथील 69 वर्षाचे पुरुष तर रामपूर (ता. दक्षिण सोलापूर) येथील 13 वर्षीय मुलीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज पंढरपूर तालुक्यात 84 तर बार्शी तालुक्यात 70 नवे रुग्ण आढळून आले आहेत.
या गावात आढळले नवे कोरोनाबाधित
माढा तालुक्यातील चिंकहिल-चिंचगाव, लऊळ, मोडनिंब, रणदिवेवाडी, सुरली, टेंभुर्णी, झेंडे गल्ली माढा, दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी फताटेवाडी, हत्तरसंग, मंद्रूप, मनगोळी, नांदणी, रामपूर, विंचूर, माळशिरस तालुक्यातील अकलूज, आनंदनगर, बोरगाव, दहिगाव, महाळूंग, माळीनगर, निमगाव, पेट्रोलपंपासमोर माळशिरस, पानीव, संग्रामनगर, वेळापूर, वाफेगाव, वाघोली, यशवंतनगर, मंगळवेढा तालुक्यातील अरळी, बोराळे, मरवडे, तळसंगी, तामदर्डी, सांगोला तालुक्यातील बलवडी, घेरडी, जवळा, लोणविरे, मेथवडे, वाढेगाव, पंढरपूर तालुक्यातील आवे, आढीव, आंबेडकरनगर, अनिलनगर, भोसे, चंद्रभागा घाट, दाळेगल्ली, धर्मशाळा, गादेगाव, गांधीरोड, गोविंदपुरा, जळोली, जुनीपेठ, कैकाडी महाराज मठ, काळा मारुती, करकंब, कौठाळी, खेडभोसे, क्रांती चौक, लक्ष्मी टाकळी, लिंकरोड, महावीरनगर, मुंढेवाडी, रामबागरोड, सांगवी, संतपेठ, सरकोली, शासकीय वसाहत, स्टाप क्वाटर उपजिल्हा रुग्णालय, तानाजी चौक, उंबरेपागे, उत्पात गल्ली, झेंडे गल्ली, बार्शीतील बाशिंगे प्लॉट, भीमनगर, दत्तनगर, देशमुख प्लॉट, धामणगाव (आ), धर्माधिकारी प्लॉट, गाडेगाव रोड, घारी, गुंड प्लॉट परांडा रोड, हांडे गल्ली, कांदलगाव, कसबा पेठ, कवे, खामगाव, कोरफळे, मंगळवार पेठ, मनगिरे मळा, नारी, पानगाव, पंकजनगर, सनगर गल्ली, श्रीपत पिंपरी, सोलापूर रोड, सुभाष नगर, उक्कडगाव, वाणी प्लॉट, झाडबुके मैदान, मोहोळ तालुक्यातील अनगर, अण्णाभाऊ साठे नगर मोहोळ, आष्टी, औंढी, बेगमपूर, कामती बु, कोन्हेरी, शेजबाभूळगाव, शिरापूर, उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज, पाकणी, राळेरास, अक्कलकोटमधील भारत गल्ली, चपळगाव, मैंदर्गी, नागणसूर, करमाळ्यातील अण्णासाहेब शाळा, देवळाली, गणेशनगर, किल्ला विभाग, मारवाड गल्ली, पांडे, राशीनपेठ, सिद्धार्थनगर येथे आज नव्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.