#JOB : सोलापूर महापालिकेत `यांना` मिळाली कायमची नोकरी

विजयकुमार सोनवणे
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

सोलापूर महापालिकेच्या www.solapurcorporation.gov.in या संकेतस्थळावर रिक्रुटमेंट या विंडोमध्ये हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. सविस्तर यादी बातमीसोबत.....

सोलापूर :  अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी विशेष भरती मोहिमेंतर्गत सोलापूर महापालिकेत 32 जागांवर थेट भरती करण्यात आली आहे. निवड झालेल्या उमेदवारांची यादी आणि प्रतिक्षीत यादी महापालिकेच्या संकेतस्थळावर सोमवारी प्रसिद्ध करण्यात आली.

छायाचित्राचा तपशील उपलब्ध नाही.

जागा 32, उमेदवार 7168, बसले 4507
भरती करायच्या 32 जागांसाठी तब्बल एक हजार 77 उमेदवार लेखी परीक्षेसाठी अपात्र झाले होते. उर्वरित सहा हजार 52 उमेदवारांना लेखी परीक्षेचे पत्र पाठविण्यात आले. या जागांसाठी सोलापूरसह नांदेड, परभणी, धुळे, अकोला, हिंगोली येथून अर्ज दाखल झाले होते. 1546 जणांनी परिक्षेला दांडी मारली. महापालिकेच्या www.solapurcorporation.gov.in या संकेतस्थळावर रिक्रुटमेंट या विंडोमध्ये हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. ही विशेष मोहिम भरतीसाठी आयुक्त दीपक तावरे, उपायुक्त अजयसिंह पवार, सहायक नगर रचना संचालक लक्ष्मण चलवादी, युवराज गाडेकर, श्री. होर्गीनमठ यांच्यासह त्यांच्या सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रक्रिया राबवली. 

छायाचित्राचा तपशील उपलब्ध नाही.

शिक्षण सेवक पदासाठी एकच अर्ज
शिक्षण सेवक पदाची एक जागा भरण्यात आली. ही जागा महिला प्रवर्गासाठी राखीव होती. त्यासाठी एकूण 18 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, हिंगणी (जि. नागपूर) येथील तांडा (दाभा) येथील सोनाली कांतीराम शिंदे या एकमेव उमेदवार पात्र ठरल्या होत्या. त्यांची नियुक्ती या पदावर करण्यात आली आहे. या पदासाठी सोलापूरसह हिंगोली, पुणे, सिंदखेड, कराड, नांदेड, उस्मानाबाद, कोरेगाव येथील उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या ई-मेल आणि मोबाईल मेसेजद्वारे निरोप पाठविण्यात आला आहे. 
 

छायाचित्राचा तपशील उपलब्ध नाही.

छायाचित्राचा तपशील उपलब्ध नाही.

छायाचित्राचा तपशील उपलब्ध नाही.

 

छायाचित्राचा तपशील उपलब्ध नाही.

छायाचित्राचा तपशील उपलब्ध नाही.

 छायाचित्राचा तपशील उपलब्ध नाही.

छायाचित्राचा तपशील उपलब्ध नाही.

छायाचित्राचा तपशील उपलब्ध नाही.

 

छायाचित्राचा तपशील उपलब्ध नाही.

छायाचित्राचा तपशील उपलब्ध नाही.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 32 person got permanant job in solapur corporation