Breaking सोलापुरातील गंगामाई, वळसंकर, रघोजी, अपेक्‍स, सिटी, युनिक हॉस्पिटल कोरोनासाठी अधिग्रहित 

Acquired for Gangamai Valsankar Raghoji Apex City Unique Hospital Corona in Solapur
Acquired for Gangamai Valsankar Raghoji Apex City Unique Hospital Corona in Solapur

सोलापूर : सोलापूर शहरातील कोरोना बाधित रुग्णांची दिवसेंदिवस वाढत जाणारी संख्या सर्वांच्याच चिंतेचा विषय झाला आहे. सोलापुरातील कोरोना रोखण्यासाठी, कोरोना बाधित रुग्णांना वेळेत उपचार देण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सोलापुरातील सहा खासगी हॉस्पिटल अधिग्रहित केले आहेत. या हॉस्पिटलमधील 470 बेडचा वापर कोरोनाचा उपचार करण्यासाठी केला जाणार आहे. 
रामवाडी येथील गंगामाई हॉस्पिटलमध्ये 100 बेड असून आयसीयुचे 25 बेड, वॉर्डमधील 20 बेड असून सात बेडला ऑक्‍सिजनची व्यवस्था आहे. रामवाडी येथील वळसंगकर हॉस्पिटलमध्ये 50 बेड असून आयसीयूचे 30 बेड आहेत. 10 रूम, 5 बेडची व्यवस्था या ठिकाणी आहे. होटगी रोडवरील रघोजी किडनी हॉस्पिटलमध्ये 100 बेडची व्यवस्था असून त्या ठिकाणी आयसीयूचे दहा बेड आहेत. ऑक्‍सिजनची व्यवस्था असलेल्या 15 रूम आहेत. चार वार्डमध्ये ऑक्‍सिजनची व्यवस्था असलेले 36 बेड आहेत. होटगी रोडवरील ×पेक्‍स हॉस्पिटलमध्ये 50 बेड असून त्यातील आयसीयूच्या दोन युनिटमध्ये 16 बेड, चार रूम व 2 वॉर्ड येथील 18 बेड उपलब्ध आहेत. रेल्वे लाईन येथील सिटी हॉस्पिटलमध्ये 80 बेड असून त्यातील सात बेड हे आयसीयू आहेत. दक्षिण कसबा येथील युनिक हॉस्पिटल मध्ये 90 बेड असून आयसीयूचे सात बेड आहेत. हे सहा हॉस्पिटल अधिग्रहीत करण्याचा आदेश जिल्हाधिकारी शंभरकर यांनी आज घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com