#Lockdown : वॉकिंगसाठी बाहेर पडणाऱ्यांनो सावधान..! 

#Lockdown : वॉकिंगसाठी बाहेर पडणाऱ्यांनो सावधान..! 

सोलापूर : लॉकडाउन, संचारबंदीच्या कालावधीत आदेशाचे उल्लंघन करून शनिवारी मॉर्निंग वॉक करणाऱ्या 102 नागरिकांविरुद्ध गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली आहे. 32 दुचाकी वाहने, एक रिक्षा, एक सायकल जप्त करण्यात आली आहे. 

हौशी कार्यकर्त्यांकडून शोबाजी; पोलिसांकडून कारवाई 

कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी शासनाने सर्वत्र संचारबंदी लागू केली आहे. या आदेशाचे उल्लंघन करून काही नागरिक सकाळी आणि सायंकाळी फिरण्यासाठी घराबाहेर पडत असल्याचे दिसून येत आहे. तसेच काहीजण अनावश्‍यक वाहनावरून फिरत आहेत, अशा लोकांवर गुन्हे शाखेच्या पथकाकडून कारवाई करण्यात येत आहे. शनिवारी सकाळी रंगभवन, जुना पुना नाका ते अवंतीनगर रोड, अक्कलकोट नाका, हरिभाई देवकरण प्रशाला, शास्त्रीनगर, होटगी रोड परिसरात गस्त घालून गुन्हे शाखेच्या पथकाने 102 जणांवर कारवाई केली आहे. यात 32 दुचाकी वाहने, एक रिक्षा, एक सायकल जप्त करण्यात आली आहेत. गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त अभय डोंगरे, पोलिस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात येत आहे. 

कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून संचारबंदी करण्यात आली आहे. भाजीपाला, मेडिकल, किराणा आणण्यासाठी शासनाने सवलत दिली आहे. मात्र, तरीसुद्धा काहीजण वॉकिंगसाठी म्हणून घराबाहेर पडत आहेत. संचारबंदीच्या काळात बाहेर न पडता घरीच व्यायाम करावा. 
- संजय जगताप, 
पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com