आडम मास्तर म्हणाले....ट्रंप, मोदी गोबॅक 

narsayya aadam
narsayya aadam

सोलापूर : नही चलेगी, नही चलेगी, मोदी तेरी तानाशाही नही चलेगी. जो हिटलर की चाल चलेगा, ओ हिटलर की मौत मरेगा. डोनाल्ड ट्रंप, नरेंद्र मोदी गोबॅक, चले जाव, चले जाव या सह इतर घोषणांनी आज सोलापूरचा जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप भारताच्या दौऱ्यावर आले असून या दौऱ्याला विरोध करण्यासाठी माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखाली आज सोलापुरात निषेध मोर्चा काढण्यात आला. 
हेही वाचा - वाचा माळशिरस तालुक्‍यातील कर्जमाफीचे लाभार्थी 
माजी आमदार आडम यांनी आपल्या पहाडी आवाजात मोदी सरकार व ट्रंप यांच्या धोरणावर कडाडून टीका केली. साम्राज्यवादी अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या स्वागतासाठी मोदी सरकार पायघड्या घातल्या आहेत. त्यांना सोन्याच्या ताटात बादशाही भोजनाची व्यवस्था केली. या देशात आजही 30 कोटी भारतीय जनता दररोज उपाशीपोटी राहते. त्यांच्यासाठी सरकार कधी चतकोर भाकरी देऊ शकत नाही. ही या देशाची खरी शोकांतिका असल्याचा आरोप माजी आमदार आडम यांनी केला आहे. 

हेही वाचा - बापरे..! बांधकाम कामगारांची बोगस नोंदणी..! 
माकपचे जिल्हा सचिव ऍड एम. एच. शेख यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. या मोर्चात काळे झेंडे घेऊन आणि काळ्या फिती लावून आंदोलनकर्ते सहभागी झाले होते. माजी आमदार आडम म्हणाले, अमेरिका आणि भारत कराराला विरोध का? अमेरिकेत यंदा राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक आहे. या निवडणुकीला सामोरे जाताना भारताशी महत्त्वपूर्ण करार करून अमेरिकेच्या जनतेची सहानुभूती मिळविण्याचा ट्रंप यांचा प्रयत्न आहे. डोनाल्ड ट्रंप हे धर्मांध आणि वंशवादाचा पुरस्कर्ते असून अमेरिकेतील स्थलांतरित लोकांना जाणीवपूर्वक त्रास देऊन त्यांना अमेरिकेबाहेर पाठवण्याचा त्यांचा डाव असल्याचा आरोपही माजी आमदार आडम यांनी केला आहे. यावेळी ऍड. एम. एच. शेख, नगरसेविका कामिनी आडम, व्यंकटेश कोंगारी, सिद्धप्पा कलशेट्टी, युसूफ मेजर, नलिनी कलबुर्गी, नसीमा शेख, महंमद हनिफ सातखेड, सलीम मुल्ला, अनिल वासम, दत्ता चव्हाण, नरेश दुगाने, मुरलीधर सुंचू, दाऊद शेख, बापू साबळे, अकील शेख, शंकर म्हेत्रे, बाबू कोकणे,लिंगव्वा सोलापुरे, शकुंतला पानिभाते, फातिमा बेग, विल्यम ससाने, जावेद सगरी, बाळासाहेब मल्ल्याळ, विजय हरसुरे, महिबूब हिरापूरे, मल्लेशम कारमपुरी, वसीम मुल्ला, किशोर मेहता, शहाबुद्दीन शेख,वीरेंद्र पद्मा, सनातन म्हेत्रे, महादेव घोडके आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com