कोल्हापूर संस्थान विलिनीकरणाचे साक्षीदार एडीसी मोहनसिंह बायस 

bayas.jpg
bayas.jpg

सोलापूर : कॅप्टन मोहनसिंह बायस हे राजाराम रायफल्स मध्ये कोल्हापूरच्या शाहू महाराजाचे शाही सैन्य अधिकारी होते. त्यांनी कोल्हापूर राज्यातील शेवटचे छत्रपती शहाजी राजे यांचे एडीसी म्हणून काम केले. ब्रिटिशांनी बंडखोर पख्तुन आदिवासींविरूद्ध दुसऱ्या महायुद्धाच्या काळात शांतता राखण्यासाठी त्यांना अफगाणिस्तान सीमेवर लॅंडलिककोट पाठवले होते. 
मीराबाई आणि मोहनसिंह हे दाम्पत्य एकत्र भेटले तेव्हा मोहनसिंह हे केवळ 18 वर्षांचे होते.  

कोल्हापूरच्या संस्थानच्या विलिनीकरणाच्या काळाचे ते प्रमुख साक्षीदार होते. मोहनसिंग बायस हे छत्रपती शहाजीराजे यांच्यासमवेत सरदार वल्लभभाई पटेल यांना भेटण्यासाठी गेले होते. सरदार पटेलचे सचिव व्ही.पी. मेनन यांनी छत्रपती शहाजीराजे यांना दाखवून दिले की 6 महिन्यांपूर्वीच बडोदा संस्थांनने विलिनीकरण करारावर स्वाक्षरी केली आहे. तेव्हा सरदार पटेल यांनी त्यांना विलीनीकरणाच्या कागदपत्रावर स्वाक्षरी करण्यासाठी तयार केले. जेव्हा छत्रपती शाहू महाराज सभागृहाच्या बाहेर येताच त्यांनी व्यथीत अंतकरणाने एडीसी मोहनसिंग बायस यांच्याकडे आम्ही आपला कोल्हापूर गमावला असे उद्गार काढले. या एैतिहासिक घटनेचे मोहनसिंह बायस हे एकमेव साक्षीदार होते. 

जरी त्या काळात शिकारीची रुढी होती मात्र माझे आजोबा हे महान निसर्गवादी होते. जंगल युद्ध शिकत असताना ते जिम कॉर्बेटसह चालत गेले. जेव्हा ते थोडी विश्रांती घेण्यास बसले, तेव्हा जिम कॉर्बेटने शांतपणे त्यांना सांगितले की तुम्ही वेटोळा घातलेल्या अजगरावर बसले आहात. 
कोल्हापूर संस्थान विलिन झाल्यानंतर मोहनसिंग बायस यांची सेवा राज्य पोलिस दलात समाविष्ट झाली. त्यांनी डहाणू, धुळे, अलिबाग आणि सोलापुरात सेवा बजावली. ते बरीच वर्षे नागपूरचे एसीपी म्हणून काम करत असताना त्यांची ही कारकिर्द गाजली. जांबुवंतराव धोटे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या हिंसक जमावावर पोलिसांनी गोळीबाराने काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीत हायकोर्टाचे न्या. घाटणे यांनी म्हटले आहे की, काही प्राणांचे बलिदान देऊन मोहनसिंग यांनी सुमारे एक लाखाहून अधिक लोकांचा जमाव केवळ एका पलटणीच्या मदतीने पांगवला. त्यांनी जमाव पांगविला नसता तर नागपूर शहर पेटले असते व किंबहूना या पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला असता हा निष्कर्ष काढला. या कामगिरीसाठी त्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला होता. 
एक तरुण पोलिस अधिकारी म्हणून ते पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंच्या सुरक्षा व्यवस्थेचे प्रभारी होते. जेव्हा लोक पंतप्रधानांच्या अगदी जवळ आले. त्यांनी लाठीचा वापर अंतर ठेवण्यासाठी केला. तेव्हा नेहरूजींनी लाठी घेऊन तेथील लोकांना तुम्ही अशी वागणूक घेऊ नका अशी सांगितले. पोलिसांच्या प्रोटोकॉलनुसार मी माझ्या पंतप्रधानांना सुरक्षित ठेवतो आहे असे उत्तर देताच तेव्हा नेहरूजी फक्त हसून प्रतिसाद दिला. 
मोहनसिंह बायस हे एका मोठ्या संयुक्त कुटुंबाचे केंद्र होते. त्यांची पत्नी मीरा यांनी तीन पिढ्यांवरील सर्व मुले, नातवंडे आणि पतवंडे यांच्यासाठी एक रम्य बालपण घडवले. दरवर्षी आम्ही आमचे आजोबा मोहनसिंह यांच्यासोबत मोठ्या एकत्र कुटुंबामध्ये स्वप्नासारखे सुट्टी घालवत होतो. बागेत स्क्रीनवर फिल्म लावण्यापासून ते आईस्क्रीमच्या बादल्या आणण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीचा आनंद आम्ही घेतला. 
त्यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटकातील वन्य बिबट्या आणि हत्तींशी झालेल्या चकमकींचा इतिहास सांगणारे दांडेलीची वाघीण हे एक अप्रतिम पुस्तकही लिहिले. 
नातवांसमवेत त्यांनी अनेक देशांना भेट दिली. त्यांनी आयुष्याची शतकी खेळी करावी अशी आमची सर्वांची इच्छा होती. पण देवाची इच्छा काही वेगळी होती. आज वयाच्या 99 व्या वर्षांच्या वयातच झोपेच्या वेळी त्यांचे निधन झाले. आम्ही 8 नातवंडे आणि नातवंडांची पुढची पिढी नेहमीच या पोलिस अधिकाऱ्याच्या आठवणीची स्मृती जागवत असताना ते आमच्यासाठी आदर्शच असे व्यक्तीमत्व होते. त्यांनी मला नागरी सेवेत रुजू होण्यासाठी प्रेरित केले. आमच्या सर्वांचे प्रेमळ आजोबा ज्याने आमचे बालपण सर्वात आश्‍चर्यकारक बनविले आणि आमच्या आयुष्याचा आनंदी काळ देखील घडवला..... 

लेखक : प्रविणसिंह परदेशी (ज्येष्ठ सनदी अधिकारी), ग्लोबल प्रोग्रॅम कोऑर्डिनेटर युनायटेड नेशन्स इन्स्टिट्यूट ऑफ ट्रेनिंग अँन्ड रिसर्च.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com