सोलापूर जिल्ह्यात युरियाची पुरेशा प्रमाणात उपलब्धता 

सोलापूर जिल्ह्यात युरियाची पुरेशा प्रमाणात उपलब्धता 

सोलापूर ः जिल्ह्यात यंदा खरीप हंगामासाठी सर्वच ग्रेडच्या खताची पुरेशी उपलब्धता आहे. त्यातही सर्वाधिक मागणी असणाऱ्या युरिया आणि डीएपी या खताची सर्वाधिक उपलब्धता आहे. पण, तरीही काही तालुक्‍यांमध्ये युरिया मिळत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. 

जून-जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्याने खरिपाचा पेरा वाढला आहे. जवळपास 135 टक्‍क्‍याच्याही पुढे पेरणी गेली आहे. त्यात तूर, सोयाबीन, मूग, उडीद, मका, बाजरी आदी पिकांचा समावेश आहे. त्यातही सोयाबीन आणि तुरीची सर्वाधिक पेरणी झाली आहे. गेल्या पंधरवड्यापासून मूग, उडदाची पिके काढणीला आली आहेत. तर अन्य काही पिके आता फुलोऱ्याच्या स्थितीत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर युरियाची मागणी वाढली आहे. ऊसाच्या बांधणीसाठीही खतांचा वापर होतो आहे. पण अनेक ठिकाणी त्याचा कृत्रिम तुटवडा निर्माण केला जात आहे. मधल्या काळात काही तांत्रिक अडचणीमुळे युरियाची रेक आली नव्हती. पण, आता युरियाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. जवळपास 79 हजार 750 टन युरिया जिल्ह्यात आहे. तर डिएपीही 28 हजार 230 टन इतका उपलब्ध आहे. त्याशिवाय म्युरेट ऑफ पोटॅश 20 हजार 960, सिंगल सुपर फॉस्फेट 24 हजार 20 टनापर्यंत उपलब्ध आहेत. खताच्या उपलब्धतेची ही परिस्थिती असतानाही काही ठिकाणी खतासाठी गर्दी दिसून येते. गेल्याच आठवड्यात पॉस मशिन वापराबाबत दुर्लक्ष केल्याबद्दल जिल्ह्यातील 21 खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित केले आहेत. काही तालुक्‍यांमध्ये खतांचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. मात्र, त्याची जादा दराने विक्री होत आहे. याशिवाय त्याच्यासोबत इतर लिंकींग देण्याचा प्रयत्न होतोय. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com