बार्शी, पंढरपूर नंतर माळशिरसने ओलांडला पाच हजाराचा टप्पा, कोरोनामुळे 11 जणांचा मृत्यू

corona
corona

सोलापूर : महापालिका हद्दीत 9 हजार 275 तर ग्रामीण भागात 29 हजार 34 असे एकूण सोलापूर जिल्ह्यात 38 हजार 309 कोरोनाबाधित झाले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी व पंढरपूर तालुक्‍याने यापूर्वीच कोरोनाबाधितांच्या संख्येचा पाच हजाराचा टप्पा ओलांडलेला आहे. आजच्या अहवालानूसार माळशिरस तालुक्‍यात 52 नव्या बाधितांची भर पडल्याने माळशिरस तालुक्‍यानेही आता कोरोनाबाधितांच्या संख्येचा पाच हजाराचा टप्पा ओलांडला आहे. 

आतापर्यंत माळशिरस तालुक्‍यात 5 हजार 17, पंढरपूर तालुक्‍यामध्ये 5 हजार 736 आणि बार्शी तालुक्‍यामध्ये 5 हजार 215 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. महापालिका हद्दीत 17 तर ग्रामीण भागात 111 अशा एकूण 128 नव्या कोरोनाबाधितांची भर आज जिल्ह्याच्या आकडेवारीत पडली आहे. ग्रामीण भागातील 10 व महापालिका हद्दीतील 1 अशा एकूण 11 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचेही आजच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या आता 1 हजार 350 झाली आहे. त्यामध्ये ग्रामीण भागातील 833 तर महापालिका हद्दीतील 514 जणांचा समावेश आहे. 

आजच्या अहवालानूसार 263 जण एकाच दिवशी कोरोना मुक्त झाले आहेत. त्यामध्ये ग्रामीण भागातील 215 तर महापालिका हद्दीतील 48 जणांचा समावेश आहे. सोलापूर जिल्ह्यातील 32 हजार 755 जण आतापर्यंत कोरोना मुक्त झाले आहेत. रुग्णालयात सध्या 4 हजार 207 जणांवर उपचार सुरु आहेत. त्यामध्ये ग्रामीण भागातील 3 हजार 565 तर महापालिका हद्दीतील 642 जणांचा समावेश आहे. कोरोना चाचणीचे अद्यापही 42 अहवाल प्रलंबित आहेत. हे सर्व अहवाल ग्रामीण भागातील आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com