मंगळवेढ्यात का सरू आहे नगरसेवक, कर्मचाऱ्यांचे आंदोलन

Agitation Day is in Mangalvedha
Agitation Day is in Mangalvedha

मंगळवेढा (सोलापूर) : येथील नगरपालिकेत नगराध्यक्ष, नगरसेवक आणि नगरपालिकेचे कर्मचारी यांनी वेगवेगळ्या मार्गातून नगरपालिकेच्या प्रवेशव्दारात आंदोलन सुरू केली आहेत. या आंदोलनाची शहरात चर्चा रंगली आहे.
सकाळी नगरपालिकेत ध्वजारोहण झाल्यानंतर तिघांनी स्वतंत्रपणे आंदोलन सुरू केली आहेत.

यामध्ये नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांच्या मनमानी कामकाजावर कारवाई करून गुन्हे दाखल करून निलंबित करावे, या मागणीसाठी नगराध्यक्षा अरूणा माळी यांनी आंदोलन सुरू केले. त्यांच्या मागणीत फॉर्म नंबर 64 व नगराध्यक्षाची सही न घेता दोन कोटीची बिल देणे, घंटागाडी चालकाची निविदा न करता दुसऱ्याच्या ठेक्यातून बिले काढून भ्रष्टाचार, संगणक चालकाला स्वताच्या गाडीवर चालक म्हणून वापरून आवक जावक विभागात अधिकार नसलेल्या व्यक्तीची नेमणूक करून टक्केवारी वसुली करणे,  पाणीपुरवठा विभागात ठेकेदाराचे सहा महिन्यानंतरही करारपत्र न केल्याचा आरोप केला आहे. 
 

कर्मचाऱ्यांचे आंदोलन....
नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी नगराध्यक्षांचा मनमानी कारभार, खोट्या तक्रारी, दमबाजी करणे यावरून काम बंद आंदोलन सुरू केले. नगरपरिषद कर्मचारी संघटनेचे बाबासाहेब पवार यांनी दिलेल्या निवेदन दिले आहे. त्यांनी त्यात म्हटले की, विकास कामे बाजूला ठेवून प्रशासकीय कामात हस्तक्षेप करून खोट्या तक्रारी करतात, राष्ट्रवादीच्या लेटर पॅडचा वापर करून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून दबाव आणण्याचा प्रयत्न होत असल्याचे म्हटले आहे.
 

नगरसेवकांचे आंदोलन...
13 नगरसेवकांनी देखील नगरपालिकेच्या बाजूस आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्या मागण्यामध्ये नगराध्यक्षा अरुणा माळी यांचे पती नगरपालिकेच्या कामात हस्तक्षेप करून दबाव आणत आहेत. तक्रार करूनही कारवाई होत नाही. अतिक्रमण काढू नये यासाठी मुख्याधिकारी यांच्यावर दबाव आणत असून अतिक्रमणास नगराध्यक्षा प्रोत्साहित करत असून त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. बनावट शिक्के व प्रमाणपत्राचा वापर करून नगरपालिकेत ठेका मिळालेल्या ठेकेदारावर काळ्याची यादीत टाकण्यात येवूनही पुन्हा ठेका देणे. विकास कामासाठी शहरात मोठ्या प्रमाणात निधी येत आहेत परंतु काम केलेल्या ठेकेदाराची रेल्वे काढा करत असल्यामुळे हे ठेकेदार काम करण्यास तयार नाहीत जो, असा त्यांचा आरोप आहे.

पल्लवी पाटील, मुख्याधिकारी : आपण पालकमंत्र्या बरोबर असलेल्या डिपीसीच्या बैठकीसाठी सोलापूर येथे आले आहे. आंदोलन सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com