चौथ्या प्रयत्नात काढला त्याने बापाचा काटा

चौथ्या प्रयत्नात काढला त्याने बापाचा काटा

कुर्डू (जि. सोलापूर) ः बंदुकीच्या गोळ्यांचा प्लॅन हुकल्यानंतर झोपीच्या गोळ्यांचाही असर न झाल्याने केलेल्या चौथ्या प्रयत्नात विशालला आपल्या बापाचा काटा काढण्यात यश आल्याचे आता तपासात होत असल्याचे समजते.
बार्शीचे कृषी सहायक अंगद घुगे यांचा खून होण्यापूर्वी 11 जानेवारीच्या दरम्यान खुनाचा पहिला कट शिजला. घुगे यांची बहीण कळंब (जि. उस्मानाबाद) येथे असते. घुगे यांची पत्नी अपहाराच्या प्रकरणात अडकल्यानंतर तिला या प्रकरणातून सोडविण्यासाठी घुगे यांनी जीवाचे रान केले. याच कामासाठी ते कळंब येथील बहिणीकडे गेले होते. आपला बाप कळंबला जाणार असल्याची माहिती विशालला समजल्यानंतर पहिला कट रचला. वडील कळंब येथून परत येत असताना खून करण्याचे ठरले होते. मात्र दुचाकीवर गेलेले घुगे येताना बसने आल्याने हा डाव फसला. यानंतर वडिलांना जेवणातून झोपेच्या गोळ्या देऊन बेशुद्धावस्थेत संपविण्याचा कट उदयास आला. विशालच्या योजनेनुसार त्याची आई जयश्रीने जेवणातून झोपेच्या गोळ्या दिल्या, मात्र या गोळ्यांचा घुगे यांच्यावर परिणाम न झाल्याने हा डावही फसला. 
यानंतर विशालचा मित्र अतुल गांधलेने नवा डाव आखण्यास सुरवात केली. गांधले हा पूर्वी पाच वर्षे मुळशी (जि. पुणे) परिसरातील भाईगिरीमध्ये वावरला होता. गांधले याने त्या ठिकणाच्या भाईला संपर्क करून सुपारी देण्याचा प्रयत्न केला, मात्र 15 लाखांची सुपारी महागाची ठरल्याने ही योजनाही बारगळली. भाईला मोठी रक्कम देण्यापेक्षा काही लाखांमध्ये आपणच सुपारी घ्यावी, असे गांधलेने निश्‍चित केले. आपल्या संगतीला भाऊ प्रसाद गांधले व विकी शिंदे यांना सहभागी करून घेतले. विशालने दिलेल्या माहितीनुसार गांधले बंधूंनी घुगे यांना नारी गावाकडे जात असताना त्यांच्या गाडीला धडक दिली. जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या घुगे यांना गाडीत नेऊन निंबळक (ता. बार्शी) गावाजवळ त्यांचा गळा दाबून व हत्याराने वार करून गाडीतच खून केला. त्यानंतर लऊळ (ता. माढा) शिवारात मृतदेह पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न झाला. मात्र, मृतदेह अर्धवट जळाला. त्यामुळे ही घटना उघडकीस आली. 
या घुगे खून प्रकरणात मुलगा विशाल, आई जयश्री व त्यांच्या तीन मित्रांनी चौथ्या प्रयत्नात खुनाचा डाव यशस्वी केला. 

महाराष्ट्र

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com