अक्कलकोट भाजपतर्फे महिला सुरक्षाप्रश्नी सरकारविरोधी एल्गार; आक्रोश मोर्चाद्वारे दिले तहसीलदारांना निवेदन 

Akkalkot BJP Agitation
Akkalkot BJP Agitation

अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट येथे आज (सोमवारी) भाजप महिला मोर्चाच्या वतीने महिलांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात तसेच त्यांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव आंदोलन छेडून नायब तहसीलदार बालाजी बनसोडे यांना निवेदन देण्यात आले. 

या वेळी आंदोलक म्हणाले, महाराष्ट्रात तीन पक्षांच्या तसेच मोठा विकास करण्याचे ठरवून एकत्र आलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात मूळ विषय बाजूला राहून महिला सुरक्षेचा प्रश्न अतिगंभीर होत चालला आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बलात्कार, अत्याचार, विनयभंग व हत्याकांडांचे सत्र सुरूच आहे. त्यातच कोरोना महामारीसारख्या अतिसंवेदनशील काळातही कोव्हिड सेंटर व हॉस्पिटल्समध्ये महिलांवरील अत्याचार आणि विनयभंगाचे सत्रही काही केल्या थांबेना झाले आहेत. 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या घटनांबद्दल निवेदन पाठविले. या निवेदनाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याला साधा विधायक प्रतिसाद देण्याची शिष्टाई देखील मुख्यमंत्र्यांनी दाखविली नाही. या सरकारचा प्रशासनावर देखील अंकुश नसल्यामुळे प्रशासनदेखील महिला अत्याचारांच्या या घटनांना गांभीर्याने घेत नाही. वरीलप्रमाणे सर्व वस्तुस्थिती असल्यामुळे भाजप महिला मोर्चा, महाराष्ट्र प्रदेशतर्फे महाराष्ट्रातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊन महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोव्हिड सेंटर्स व हॉस्पिटल्समध्ये महिलांवर झालेल्या अत्याचारांच्या घटनांना वाचा फोडण्यासाठी एकदिवसीय आंदोलनही करण्यात आले होते. 

या वेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, महेश हिंडोळे, मंगल कल्याणशेट्टी, महिला आघाडीच्या सुरेखा होळीकट्टी, सोनाली शिंदे, उपनगराध्यक्ष यशवंत धोंगडे, अक्कलकोट तालुका भाजप अध्यक्ष मोतीराम राठोड, शिवशरण जोजन, बसवंत कलशेट्टी, रमेश कापसे, विक्रम शिंदे, शिवशंकर स्वामी, दीपक जरीपटके, अरुणा पवार, अश्विनी मोरे, अंबुबाई कामनूरकर, भागूबाई कुंभार, पूजा राठोड, भागीरथी भरमा, विजयालक्ष्मी बुक्कानुरे, दीपाली आळगी, प्रभाकर मजगे, गुंडप्पा पोमाजी, राजेंद्र बंदिछोडे, विश्वनाथ इटेनवरू, दयानंद बमनळ्ळी, गेनसिद्ध पाटील, शिवपुत्र बुक्कानुरे, श्रीशैल नंदर्गी, संतोष आळगी, नागनाथ कुंभार, बंटी राठोड, विक्रम शिंदे, छोटू पवार, शिवरुद्र भत्ता, लक्ष्मण बुरुड, गिरमलप्पा भरमा, सुनील गवंडी आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com