1Ramdas_20Athawale.
1Ramdas_20Athawale.

Gram Panchayat Results : अक्कलकोटमध्ये रिपाइं आठवले गटाच्या उमेदवारांचा गवगवा ! 31 उमेदवार निवडून आल्याचा दावा 

अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट तालुक्‍यात ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया संपली असून, आज शेवटचा निकाल होता. यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली व रिपाइं तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे यांच्या नेतृत्वाखाली रिपाइं आठवले गटाने वर्चस्व प्रस्थापित केल्याचा दावा अविनाश मडिखांबे यांनी "सकाळ'शी बोलताना केला. 

मडिखांबे यांच्या दाव्यानुसार अक्कलकोट तालुक्‍यातील 634 सदस्यांसाठी 72 ग्रामपंचायतींच्या माध्यमातून निवडणूक झाली. 634 विजयी उमेदवारांमध्ये रिपाइंचे सदस्य रिपाइंचे निवडून आल्याचे श्री. मडिखांबे यांनी सांगितले. 

बिनविरोध व निवडून आलेले रिपाइंचे उमेदवार : बसवराज अंदप्पा निम्मे (संगोगी आ), दत्ता खंडप्पा सोनकांबळे (गौडगाव खु), रेश्‍मा रत्नदीप सोनकांबळे (गौडगाव खु), जुलेखा सादिक मुल्ला (गौडगाव खु), प्रीती इरणा दसाडे (चिकेहल्ली), कल्पना बागसरेप्पा सोनकांबळे (सिनूर), जगदीश विठ्ठल उजनी (सिनूर), इरण्णा नीलकंठ गायकवाड (उडगी), मलम्मा सायबणा पाटोळे (उडगी), अंबिका बाबूराव आचगोंडा (बबलाद), विजयकुमार गायकवाड (ब्यागेहळ्ळी), कविता गायकवाड (ब्यागेहळ्ळी), अंबिका रवी गायकवाड (ब्यागेहळ्ळी), सोमनाथ धसाडे (चिक्केहळ्ळी), दिलीप माळी (मुंढेवाडी), यल्लप्पा सावळे (मुंढेवाडी), लक्ष्मी राकेश कांबळे (बोरोटी खु), सरुबाई सिद्धप्पा कांबळे (बोरोटी खु), धोंडिबा गायकवाड (बासलेगाव), कमलाकर सोनकांबळे (गोगाव), निर्मल श्रीमंत मेनशे (गुड्डेवाडी), संगप्पा इंगळे (गुड्डेवाडी), सुभाष सोनकांबळे (सांगवी), कस्तुरबाई शिंदे (हैद्रा), शकुंतला दोडमनी (मुगळी), राजकुमार गवळी (कुरनूर), शांताबाई गुलोळी (बोरी उमरगा), निर्मला बिराजदार (बोरी उमरगा), पंकज नागुरे (नागूर), मल्लवा गायकवाड (तडवळ), उमेश शिवशरण (तडवळ). 

आज निवडणूक निकाल जाहीर झाला असून यात रिपाइंचे उमेदवार निवडून आलेले आहेत. यासाठी रिपाइं तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे, जिल्हा चिटणीस सैदप्पा झळकी, तालुका उपाध्यक्ष अंबादास गायकवाड, चंद्रकांत गायकवाड, मुस्ताक शिकूर मुल्ला, सुरेश गायकवाड, इरण्णा दसाडे, प्रा. राहुल रुही, प्रसाद माने, दिलीप माळी, सोपान गायकवाड, विजयकुमार पोतेनवरू, विजय गायकवाड, धोंडूराज बनसोडे, शुभम मडिखांबे, सोमनाथ धसाडे, रवी सलगरे, पंकज नागुरे, राजू कांबळे, दत्ता कांबळे, राकेश कांबळे व अन्य पदाधिकाऱ्यांनी विजयासाठी जोरदार प्रयत्न केले, असे श्री. मडिखांबे यांनी सांगितले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com