`या` शहरातील सर्व मिळकतींची होणार तपासणी 

`या` शहरातील सर्व मिळकतींची होणार तपासणी 

सोलापूर : शहर व गावठाण भागातील सर्व मिळकतींची तपासणी करण्यात येणार आहे. प्रत्येक मिळकतीचा बांधकाम परवाना घेतला आहे का, याची प्राधान्याने तपासणी केली जाणार आहे, ज्यांच्याकडे बांधकाम परवाना नाही त्यांना नोटीस बजावण्यात येणार असल्याचे बांधकाम परवाना विभागातील सहायक अभियंता रामचंद्र पेंटर यांनी सांगितले. 

30 टक्के बांधकामे अनधिकृत
शहरात सुमारे 30 टक्के बांधकामे अनधिकृत असल्याचा अंदाज आहे. सध्या शहरातील मिळकती व बांधकामांचा जीआयए सर्व्हे सुरू आहे. त्याचा अहवाल आल्यावर अनधिकृत बांधकामाचे प्रमाण आणखीन वाढण्याची शक्‍यता आहे. अनधिकृत बांधकामांमुळे नागरिकांची फसवणूक होऊ नये यासाठी अशा बांधकामांची यादी व तत्सम सविस्तर माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. शासन आदेशानुसार तातडीने कार्यवाही करून त्याचा अहवाल देण्याचा आदेश महापालिकेस देण्यात आला आहे. 

इमारतींचे स्ट्रक्‍चरल ऑडिट बंधनकारक
शहरातील अनेक भागांत अनधिकृत इमारतींत नागरिक वास्तव्यास असतात. त्या सर्व इमारती तत्काळ रिकाम्या करून पाडणे व्यवहार्य नसते. मात्र, अशा इमारतींमुळे होणारा धोका लक्षात घेता अनधिकृत बांधकामे पाडण्यासाठी वर्गवारी निश्‍चित केली जाणार आहे. अशा इमारतींचे स्ट्रक्‍चरल ऑडिट बंधनकारक असणार आहे. अनधिकृत बांधकामाबाबत स्थानिक प्राधिकरणाकडून कार्यवाही केली जाते. मात्र, कारवाईचे धोरण सौम्य असल्याने त्याचा गैरफायदा घेऊन काही बांधकाम व्यावसायिक अनधिकृत बांधकामांत नागरिकांना वास्तव्यास ठेवतात व बांधकाम पाडण्यापासून बचाव करतात, असे समितीला दिसले आहे. 

450 घरांचा सर्व्हे
बांधकाम परवाना विभागाकडील सहा अभियंत्यांमार्फत विजयपूर रस्ता, रोहिणीनगर, शेळगी, विडी घरकुल, बाळे या परिसरातील 450 घरांचा सर्व्हे करण्यात आला. काही मिळकतींवर विनापरवाना बांधकाम करण्यात आले आहे, काही ठिकाणी मंजूर नकाशापेक्षा जास्त बांधकाम झाले आहे. या सर्वांना नोटिसा बजावण्यात येणार असल्याची माहिती श्री. पेंटर यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com