रुग्णसेवेचे मिळाले फळ ! महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी आनंद गोसकी 

श्रीनिवास दुध्याल 
Wednesday, 2 December 2020

रुग्णसेवेसारखं पवित्र काम जगात दुसरे नाही, या उदात्त हेतूने संपूर्ण राज्यात गोरगरीब रुग्णांना सर्वतोपरी मदत करण्याचे कार्य महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक संघटना अविरतपणे करत आहे. या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी रुग्णसेवक आनंद गोसकी यांची निवड करण्यात आली आहे. 

सोलापूर : रुग्णसेवेसारखं पवित्र काम जगात दुसरे नाही, या उदात्त हेतूने संपूर्ण राज्यात गोरगरीब रुग्णांना सर्वतोपरी मदत करण्याचे कार्य महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक संघटना अविरतपणे करत आहे. या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी रुग्णसेवक आनंद गोसकी यांची निवड करण्यात आली आहे. 

संघटनेच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षांपासून राज्यातील गोरगरीब रुग्णांना शासकीय योजना तसेच खासगी संस्थेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक पाठबळ मिळवून देण्यासोबतच विविध आरोग्य आणि रक्तदान शिबिर आयोजित करण्याचे कार्य संस्थेच्या वतीने केले जात आहे. सोलापूर येथील रुग्णसेवक तथा सामाजिक कार्यकर्ता आनंद गोसकी यांच्या रुग्णसेवेतील उल्लेखनीय कार्याची दखल महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण भोटकर यांनी घेतली आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांना मदतीचा हात देण्यासाठी रुग्णसेवक आनंद गोसकी हे सदैव तत्पर असतात. आनंद गोसकी यांची सोलापूर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गोसकी हे रुग्णसेवक असून, त्यांना सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नुकतेच गौरविण्यात आले होते. आनंद गोसकी अध्यक्ष असलेल्या जनआधार फाउंडेशनकडून कोरोना संकटात मास्क, सॅनिटायझर आणि दोन वेळचे जेवण घरोघरी वाटप करण्याचे कार्यही गोसकी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते. त्या कार्याची दखल घेऊन उपजिल्हाधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी शासनाकडून आनंद गोसकी यांना सन्मानपत्र प्रदान केले होते. कोरोनाच्या काळात पोलिसांकडूनही आनंद गोसकी यांचा सन्मान करण्यात आला. दिल्ली येथील प्रबुद्धरत्न पुरस्कार देऊनही त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. 

आनंद गोसकी यांच्यासारख्या तरुणांनी पुढे येऊन गोरगरीब रुग्णांची सेवा करावी आणि एक आदर्श निर्माण करावा, असा आशावाद व्यक्त करून आनंद मधुकर गोसकी यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्याचे महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक संघटनेचे अध्यक्ष प्रवीण भोटकर यांनी नियुक्तिपत्रात नमूद केले आहे. अनेक गरीब रुग्णांना जातीने स्वत: रुग्णाच्या नातेवाइकांसोबत मुंबई - पुण्यासारख्या शहरात मोफत शासकीय योजनेतून व इतर संस्थांकडून मदत मिळवून शस्त्रक्रियेसाठी आनंद गोसकी यांनी भाग पाडले. त्यांच्या निवडीमुळे सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anand Goski elected as Solapur District President of Maharashtra State Rugnasevak Sanghatana