"या' गावाची वाटचाल कोरोना हॉटस्पॉटकडे! अँटिजेन टेस्टमध्ये डॉक्‍टरासह तिघे पॉझिटिव्ह 

उमेश महाजन 
रविवार, 2 ऑगस्ट 2020

आठवडाभराहून अधिक काळ महूद येथे कडक लॉकडाउन असतानाही कोरोना संसर्ग थांबेना. येथील रुग्णसंख्या 23 झाली आहे. 22 जुलै रोजी येथे पहिला रुग्ण सापडल्यानंतर येथील ग्रामकृती समितीने कडक लॉकडाउनची अंमलबजावणी सुरू केली आहे. दवाखाने व मेडिकल वगळता बॅंकांसह सर्व व्यवहार पूर्णपणे बंद ठेवले आहेत. गावात अनेक ठिकाणी रस्ते बंद करून प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आले आहेत. नागरिकांच्या हालचालींवर चांगलेच निर्बंध आणले आहेत. असे असतानाही रुग्णसंख्येत वाढ होत आहे. 

महूद (सोलापूर) : सांगोला तालुक्‍यातील महूद येथे डॉक्‍टर,भाजीविक्रेते, प्रशासकीय कर्मचारी यांच्यासह 50 जणांची आज रॅपिड टेस्ट करण्यात आली. यामध्ये डॉक्‍टर, भाजीविक्रेता यासह तिघेजण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आठवडाभरापासून गावामध्ये कडकडीत लॉकडाउन असतानाही महूद हॉटस्पॉट होण्याच्या मार्गावर आहे. मागे सापडलेल्या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे गेल्या दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या चाचणीचे अहवाल सोलापूर येथे प्रलंबित आहेत. 

हेही वाचा : "लोकमंगल'च्या नावाने स्वमंगल साधू नका; माजी सहकारमंत्र्यांवर कोणी केली टीका? वाचा 

आठवडाभराहून अधिक काळ महूद येथे कडक लॉकडाउन असतानाही कोरोना संसर्ग थांबेना. येथील रुग्णसंख्या 23 झाली आहे. 22 जुलै रोजी येथे पहिला रुग्ण सापडल्यानंतर येथील ग्रामकृती समितीने कडक लॉकडाउनची अंमलबजावणी सुरू केली आहे. दवाखाने व मेडिकल वगळता बॅंकांसह सर्व व्यवहार पूर्णपणे बंद ठेवले आहेत. गावात अनेक ठिकाणी रस्ते बंद करून प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आले आहेत. नागरिकांच्या हालचालींवर चांगलेच निर्बंध आणले आहेत. असे असतानाही रुग्णसंख्येत वाढ होत आहे. 

हेही वाचा : "या' जिल्ह्यात महाविकास आघाडीत बिघाडी! पालकमंत्री राष्ट्रवादीचा अन्‌ नाराजी शिवसेना, कॉंग्रेसची 

प्रशासनाने येथील वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्‍टर, मेडिकल दुकानदार, भाजीविक्रेते व प्रशासकीय कर्मचारी यांना स्वतःची चाचणी करून घेण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार येथील डॉक्‍टर, भाजीविक्रेते, प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी स्वतःची चाचणी करून घेतली. झालेल्या या रॅपिड चाचणीमध्ये एक डॉक्‍टर, एक भाजीविक्रेता यासह तिघेजण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. 

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सीमा दोडमनी यांनी आज महूदला भेट दिली. त्यांनी येथील वैद्यकीय कर्मचारी, आशा वर्कर आदींशी चर्चा करून केलेल्या उपाययोजनांची व अडचणींची माहिती घेतली. आरोग्य विभागाने दिलेल्या मार्गदर्शनानुसार कामे वेळेत करावीत, असे त्यांनी सांगितले. 

महूदचे सरपंच बाळासाहेब ढाळे म्हणाले, येथे पहिला रुग्ण सापडल्यापासून प्रशासनाने कडक लॉकडाडन केला आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचारी संख्या अपुरी आहे. तालुका प्रशासनाने यावर तत्काळ उपाययोजना करून कर्मचारी उपलब्ध करावेत. 

महूद मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. शरद नागणे म्हणाले, कोरोना महामारीच्या काळात येथील खासगी दवाखान्यांमधून रुग्णांना वैद्यकीय सेवा दिली जात आहे. प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद देत येथील डॉक्‍टरांनी स्वतःची चाचणी करून घेतली आहे. शासनाचे नियम पाळून महामारीवर मात करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Antigen test in Mahud village found three corona positive with doctor