नोव्हेंबर अखेरीस मुदत संपणाऱ्या माढा तालुक्‍यातील 82 ग्रामपंचायतींवर 23 जणांची प्रशासक म्हणून नेमणूक !

Grampanchayat
Grampanchayat

उपळाई बुद्रुक (सोलापूर) : गेल्या सहा ते सात महिन्यांपासून सर्वत्र कोरोनाने हाहाकार माजविला आहे. त्यामुळे मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. त्यानुसार ग्रामपंचायतीवर राजकीय कार्यकर्त्यांची नेमणूक होणार असल्याची चर्चा असताना, उच्च न्यायालयाने ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून स्थानिक प्राधिकरणातील सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी यांची नेमणूक करावी, असा आदेश दिला असल्याने माढा तालुक्‍यातील नोव्हेंबर अखेरीस मुदत संपणाऱ्या 82 ग्रामपंचायतींवर 23 प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. 

नोव्हेंबर अखेरीस माढा तालुक्‍यातील 82 ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींवर आता प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची प्रशासक म्हणून नेमणूक होणार आहे. प्रशासक म्हणून पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, जिल्हा परिषद शाळांचे केंद्रप्रमुख, अंगणवाडी पर्यवेक्षिका, कृषी अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक अशा कर्मचाऱ्यांची ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींना नवीन राजकीय कारभारी भेटेपर्यंत प्रशासकीय कर्मचारी, प्रशासक म्हणून ग्रामपंचायतींचा कारभार पाहणार आहेत. सध्या माढा तालुक्‍यात नेमण्यात येणाऱ्या एका प्रशासकाकडे पाच ते सहा ग्रामपंचायतींचा भार असणार आहे. त्यामुळे गावच्या समस्या कशा सुटणार, असाही प्रश्न उपस्थित होणार आहे. 

या महिन्यात मुदत संपणाऱ्या माढा तालुक्‍यातील ग्रामपंचायतींवर पुढीलप्रमाणे प्रशासक नेमले गेले आहेत : 

  • केंद्रप्रमुख विलास काळे - जाधववाडी (मो), बैरागवाडी, अरण 
  • विस्तार अधिकारी पी. आर. लोंढे - कुर्डू, महादेववाडी, ढवळस, उपळवटे, शेडशिंगे 
  • विस्ताराधिकारी डी. जी. सुतार - मोडनिंब, कुंभेज, वाकाव, विठ्ठलवाडी, लोंढेवाडी, वडाचीवाडी (अ. उ.), खैरवाडी, रणदिवेवाडी 
  • विस्ताराधिकारी डी. बी. मराठे - बारलोणी, गवळेवाडी, अकुलगाव, लहू, निमगाव, बादलेवाडी, शिराळा मा. 
  • केंद्रप्रमुख दिगंबर काळे - उपळाई बुद्रूक, उपळाई खुर्द, वडाचीवाडी (उ.बु) 
  • विस्ताराधिकारी गावडे - रुई, आलेगाव बु, आलेगाव खुर्द, टाकळी टे, रांझणी, गारअकोले 
  • विस्ताराधिकारी बी. टी. रेपाळ - अकोले बुद्रूक, लऊळ, घोटी, परितेवाडी, परिते, सापटणे टे, 
  • विस्ताराधिकारी ए. बी. ढवळे - बेंबळे, हरिनगर, अकोले खुर्द, नगोर्ली, सुर्ली, शिराळ टे, दहिवली 
  • विस्ताराधिकारी बी. एम. शिंदे - उंदरगाव, मानेगाव, केवड, चव्हाणवाडी 
  • केंद्रप्रमुख सुभाष दाढे - बावी, सोलंकरवाड 
  • केंद्रप्रमुख सुभाष लोंढे - भुताष्टे 
  • पर्यवेक्षिका अर्चना खटके - मिटकलवाडी, माळेगाव, शेवरे 
  • केंद्रप्रमुख कापसे - अंजनगाव उ, जामगाव, सुलतानपूर 
  • पर्यवेक्षिका योगिता लोखंडे - शिंदेवाडी, सापटणे भो, वेताळवाडी 
  • केंद्रप्रमुख खातुनबी आतार - तांदूळवाडी, वडाचीवाडी त. म., जाधववाडी मा 
  • कृषी अधिकारी संभाजी पवार - रिधोरे, चिंचगाव, पापनस, तडवळे म 
  • पर्यवेक्षिका लता पाटील - तांबवे टे, चव्हाणवाडी टे 
  • आरोग्य पर्यवेक्षक एन. एस. चव्हाण - धानोरे, खैराव, पाचफुलवाडी, कापसेवाडी, हटकरवाडी, बुद्रूकवाडी 
  • पर्यवेक्षिका सविता गडहिरे - भोळेवाडी, जाखले, कव्हे, बिटरगाव ह 
  • पर्यवेक्षिका आशा मगर - वरवडे, उजनी मा, होळी खुर्द 
  • अंगणवाडी पर्यवेक्षिका रतन शिंदे - महातपूर, निमगाव मा 
  • पर्यवेक्षिका उमा साळुंखे - पालवण, अकुंबे 
  • विस्ताराधिकारी पोतदार - आहेरगाव, भुंईजे, फुटजवळगाव 

कोरोनाचा कहर पाहता, तातडीने ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेणे शक्‍य नसल्याने मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर प्रशासकीय नेमणुका करण्यात आल्या आहेत. त्यामुळे गावोगावच्या प्रशासकीय स्तरावर सोयीसुविधा पुरविण्यासाठी प्रशासक सर्वतोपरीने प्रयत्न करतील. 
- संताजी पाटील, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, कुर्डुवाडी 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com