मदतीची रक्कम बँकांनी कर्जापोटी वसूल करू नये ! जिल्ह्यातील तालुकानिहाय मदत

तात्या लांडगे
Wednesday, 11 November 2020

ठळक बाबी...

 • अतिवृष्टीने नुकसान झालेल्या जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांना मिळाली 294 कोटी 81 लाख 22 हजार रुपयांची मदत
 • 33 टक्‍क्‍यांहून अधिक नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना मिळणार भरपाई
 • मदतीची रक्कम नुकसानग्रस्तांच्या बचत खात्यात होणार जमा
 • अनुदानापेक्षा जास्त रक्कम खर्च होणार नाही, याची दक्षता घेण्याची जिल्हा प्रशासनाला सूचना
 • मदतीची रक्कम बँकांनी कर्जापोटी वसूल करू नये राज्य सरकारने दिले निर्देश
 • बँकांमध्ये मदतीची रक्कम निलंबित खात्यात पडून राहू नये, यासंबंधी प्रशासनाला स्वतंत्र सूचना
 • प्राप्त निधीमधील शिल्लक रक्कम तत्काळ राज्य सरकारला परत करण्याचे निर्देश

सोलापूर : राज्य सरकारने राज्यातील अशी दुरुस्ती नुकसान झालेल्या बाधितांना मदतीचा पहिला टप्पा दिला आहे. सोलापूर जिल्ह्याला 294 कोटी 81 लाख 22 हजार रुपयांची मदत मिळाली आहे. ही रक्कम संबंधित तालुक्यातील तहसीलदारांकडे वर्ग केली असून त्याचे वाटप उद्यापासून (बुधवार) सुरू होणार आहे.

ठळक बाबी...

 • अतिवृष्टीने नुकसान झालेल्या जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांना मिळाली 294 कोटी 81 लाख 22 हजार रुपयांची मदत
 • 33 टक्‍क्‍यांहून अधिक नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना मिळणार भरपाई
 • मदतीची रक्कम नुकसानग्रस्तांच्या बचत खात्यात होणार जमा
 • अनुदानापेक्षा जास्त रक्कम खर्च होणार नाही, याची दक्षता घेण्याची जिल्हा प्रशासनाला सूचना
 • मदतीची रक्कम बँकांनी कर्जापोटी वसूल करू नये राज्य सरकारने दिले निर्देश
 • बँकांमध्ये मदतीची रक्कम निलंबित खात्यात पडून राहू नये, यासंबंधी प्रशासनाला स्वतंत्र सूचना
 • प्राप्त निधीमधील शिल्लक रक्कम तत्काळ राज्य सरकारला परत करण्याचे निर्देश

राज्यकर्त्यांनी परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या साठी विविध टप्प्यांवर मदत केली आहे त्यामध्ये मनुष्यहानी जनावरांचा मृत्यू घरांची आवश्यकता व पूर्णपणे पडझड शेतीचे नुकसान व शेती पिकांचे नुकसान यासाठी स्वतंत्र मदत दिले आहे मदतीचे वाटप सुरू केले जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील अकरा तालुक्यांना मदतीची रक्कम वर्ग केली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Banks should not recover the amount from the loan! Taluka wise help in the district