बार्शी तालुका कोरोनाबाधिताच्या रुग्णसंख्येत सोलापूर जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकावर

Barshi taluka ranks second in the number of coronary heart disease patients in Solapur district
Barshi taluka ranks second in the number of coronary heart disease patients in Solapur district

बार्शी (सोलापूर) : बार्शी शहर व तालुक्‍यात कोरोनाबाधितांची संख्या चार हजारांच्यापुढे गेली आहे. दिवसेंदिवस रुग्णात वाढ होताना दिसत असून आसपासच्या भूम, परंडा, तुळजापूर, उस्मानाबाद, माढा, करमाळा अशा सहा तालुक्‍यातून रुग्ण येत आहेत. त्यामुळे रुग्णालये अपुरी पडत आहेत. त्यासाठी आणखी तीन रुग्णालये ताब्यात घेण्यात येत असून ऑक्‍सिजनसाठी 50 लाख रुपयांची मदत देत आहोत, अशी माहिती आमदार राजेंद्र राऊत यांनी आढावा बैठकीत दिली. दरम्यान, जिल्ह्यात बाधित रुग्णांमध्ये बार्शी तालुका दुसऱ्या क्रमांकावर असून ऍक्‍टीव्ह रुग्णात आठव्या क्रमांकावर असल्याची माहिती यावेळी गटविकास अधिकारी शेखर सावंत यांनी दिली. 
शहर व तालुक्‍यातील कोरोना रुग्णवाढी संदर्भात मंगळवारी यशवंतराव चव्हाण सभागृहात अधिकारी, सर्व ग्रामसेवक यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार राऊत बोलत होते. व्यासपीठावर सभापती अनिल डिसले, तहसीलदार किरण जमदाडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक ढगे, ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ. शीतल बोपलकर, गटविकास अधिकारी शेखर सावंत, नायब तहसीलदार संजीवन मुंढे, सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी जायपत्रे, उपनिरीक्षक अमोल ननावरे उपस्थित होते. आमदार राऊत म्हणाले, शहरातील 10 हजार तर ग्रामीणमधील 13 हजार तपासण्या पूर्ण झाल्या आहेत. पण आगामी दोन महिन्यात 20 हजारपेक्षा जास्त टेस्ट होणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात रुग्ण अधिक असून गावचे सरपंच, पदाधिकारी प्रशासनाला सहकार्य करतील. अडचण आली तर प्रत्यक्ष मी येऊन मार्गदर्शन करणार असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. 
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक ढगे म्हणाले की, तालुक्‍यात टेस्ट कॅम्प घेण्याचे नियोजन केले असून सद्यस्थितीत कॅम्प घेतला की 25 ते 50 पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. नागरिकांना प्रोत्साहन देऊन रोज 250 तपासण्या कराव्या लागतील. वैरागमध्ये आत्तापर्यंत 283 रुग्ण आढळले असून तेथे कॅम्प घेणे गरजेचे आहे. गटविकास अधिकारी शेखर सावंत म्हणाले, की तालुक्‍यातील 129 ग्रामपंचायतींपैकी 111 ग्रामपंचायतीत कोरोना रुग्ण आढळले असून 18 गावे अद्याप कोरोनामुक्त आहेत. जिल्ह्यात बाधित रुग्णांमध्ये बार्शी तालुका दुसऱ्या क्रमांकावर असून ऍक्‍टीव्ह रुग्णात आठव्या क्रमांकावर आहे. तालुक्‍यातील 78 प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी केली तेव्हा विस्कळीतपणा दिसून आला. झोन व्यवस्थित पाळली पाहिजे. सर्व मिळून कोरोना अटोक्‍यात आणण्यासाठी प्रयत्नशील राहू, असेही सावंत म्हणाले. 

बार्शी तालुक्‍यातील कोरोनामुक्त गावे 
आंबेगाव, निंबळक, मिर्झनपूर, तुर्कपिंपरी, सावरगाव, कळंबवाडी (आ), संगमनेर, वालवड, कासारी, ढोराळे, भानसाळे, बळेवाडी, पिंपळगाव (दे), बेलगाव, पांढरी, ममदापूर, भांडेगाव, अंबाबाईवाडी. 

संपादन : वैभव गाढवे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com