
पुणे पदवीधर मतदार संघातील पदवीधर उमेदवारासाठी मोहोळ तालुक्यातील 3 हजार 333 मतदार तर शिक्षक मतदारसंघातील उमेदवारासाठी 757 असे एकूण 4 हजार 90 मतदार आपला मतदानाचा हक्क मंगळवारी (1 डिसेंबर) बजावणार असून, मतदान सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत होणार असल्याची माहिती तहसीलदार जीवन बनसोडे यांनी दिली.
मोहोळ (सोलापूर) : पुणे पदवीधर मतदार संघातील पदवीधर उमेदवारासाठी मोहोळ तालुक्यातील 3 हजार 333 मतदार तर शिक्षक मतदारसंघातील उमेदवारासाठी 757 असे एकूण 4 हजार 90 मतदार आपला मतदानाचा हक्क मंगळवारी (1 डिसेंबर) बजावणार असून, मतदान सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत होणार असल्याची माहिती तहसीलदार जीवन बनसोडे यांनी दिली.
यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मोहोळ तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. पदवीधर निवडणुकीसाठी एकूण सात मतदान केंद्राध्यक्ष नियुक्त केले आहेत तर शिक्षक निवडणुकीसाठी पाच मतदान केंद्राध्यक्ष नियुक्त केले आहेत. दोन्ही निवडणुकांसाठी तीन क्षेत्रीय अधिकारी व दोन राखीव अशा पाच जणांची नियुक्ती केली आहे. मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी तीन भरारी पथके तैनात केली आहेत. एका पथकात तीन जणांचा समावेश आहे.
पदवीधरांसाठी एकूण सात मतदान केंद्रे तर शिक्षकांसाठी पाच मतदान केंद्रे आहेत. निवडणुकीची मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी नायब तहसीलदार जीवन बनसोडे यांच्यासह मोईन डोणगावकर, महेंद्र नवले, मनोज पुराणिक त्यांचे सर्व सहकारी परिश्रम घेत आहेत.
पोलिस बंदोबस्त तैनात
मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर वेब कास्टिंग कॅमेरे असून, व्हिडीओ शूटिंगही सुरू राहणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अशोक सायकर यांनी दिली.
परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी एक पोलिस निरीक्षक, चार सहाय्यक पोलिस निरीक्षक, 29 पोलिस कर्मचारी, 22 होमगार्ड तर याव्यतिरिक्त प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वारंवार मतदान केंद्र तपासणीसाठी तीन पोलिस आधिकारी नियुक्त केले आहेत. फिरती गस्तही सुरू राहणार आहे.
अशी आहे निवडणुकीची मोहोळ तालुक्याची वस्तुस्थिती
अशी आहेत मतदान केंद्रे
पदवीधरसाठी
शिक्षकसाठी
संपादन : श्रीनिवास दुध्याल