पक्षी निरीक्षकांना प्रतिष्ठा मिळावी : मारुती चितमपल्ली ; पक्षी सप्ताहाला प्रारंभ

Maruti_Chitampalli.jpg
Maruti_Chitampalli.jpg

सोलापूर : आमच्या तरुणपणी पक्षी निरीक्षकांना फारसा मान नव्हता, दुर्बिण घेऊन पक्षी निरीक्षण करणे, हे चांगले लक्षण मानलं जात नसे, हा अनुभव अगदी समीर अली यांनाही आला आहे. कुचेष्टा केली जात असे तरी, आम्ही निराश न होता काम सुरू ठेवले. हे सारे सहन करून पक्षी निरीक्षण केले, ते शब्दबद्ध केले त्याबद्दलचे अनेक "पेपर्स' आतंरारष्ट्रीय स्तरावर पोहचले, हे सारं सहन केल्यानेच आज हे पक्षीकोश, वृक्षकोश साकारले. पक्षी निरीक्षकांना प्रतिष्ठा प्राप्त व्हावी, अशी अपेक्षा ज्येष्ठ साहित्यिक मारुती चितमपल्ली यांनी व्यक्त केली. पक्षी सप्ताहाचे उद्‌घाटन श्री सिध्देश्‍वर वन विहार, सोलापूर येथे गुरुवारी सकाळी दहा वाजता झाले, त्यावेळी ते बोलत होते. 

5 नोव्हेंबर हा दिवस मारुती चितमपल्ली यांचा नव्वदावा वाढदिवस तर 12 नोव्हेंबर हा समीर अली यांचा जन्मदिन आहे. 5 ते 12 नोव्हेंबर या या कालावधीत पक्षी सप्ताह साजरा करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला असून सोलापूर येथे पक्षी सप्ताहाला प्रारंभ झाला. यावेळी मारुती चितमपल्ली यांच्या हस्ते वटवृक्षाचे रोपण करण्यात आले तसेच येथील निसर्ग निरीक्षण केंद्रात अरण्यऋषी कक्षाचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर मुख्य वन संरक्षक पुणे प्रादेशिक सुजय डोडल, वन संरक्षक रमेश कुमार, वन संरक्षक धैर्यशील पाटील, विभागीय वनाधिकारी सुवर्णा माने, सहाय्यक वनसंरक्षक बाबा हाके, आदी उपस्थित होते. 

यावेळी ज्येष्ठ साहित्यिक मारुती चितमपल्ली यांनी पुढे सांगितले की, ब्रिटीशांच्या कोश वाड्‌मयात मोठ्या प्रमाणात माहिती आहे. यातील कित्येक शब्दांसाठी मराठीत प्रतिशब्द नाहीत. मी अनेक शब्दात मराठी प्रतिशब्द तयार केले. अनेकदा संस्कृत, प्राकृत, पाली भाषेतून हे शब्द निवडले त्याबरोबर आदीवासींच्या बोली भाषेतूनही कोश वाड्‌मयासाठी शब्द घेतले. या सर्व शब्दाची बेरीज एक लक्षाहून अधिक भरते. त्यांच्या कार्यकाळातील अनेक अनुभव त्यांनी यावेळी सांगितले. 

यावेळी निवृत्त वनपाल बी.एस शेळके यांनी "मानवा वृक्ष का तोडिले' ही कविता सादर केली. सूत्रसंचालन चेतन नलावडे यांनी केले. आभार के. एन साबळे यांनी मानले. कार्यक्रमास आकाशवाणीचे सहाय्यक संचालक सुनिल शिनखेडे, ज्येष्ठ पक्षीपप्रेमी निदान शहा, पक्षी निरीक्षक डॉ. व्यकंटेश मेनत, सिध्देश्‍वर वनविहारच्या श्रीमती कोरे, नेचर कंजर्वेशन सर्कलचे भरत छेडा, मसाप जुळे सोलापूरचे पद्माकर कुलकर्णी, डॉ.सुहास पुजारी, मारुती कटकधोंड, पप्पू जमादार, आंनद बिराजदार, संध्याराणी बंडगर, नवनाथ भानवसे, संजय भोईटे आदी उपस्थित होते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com