मंदिर बंद, उघडले बार, उध्दवा धुंद तुझे सरकार ! - सोलापूर शहर व जिल्ह्यात भाजपतर्फे निदर्शने 

BJP protests in Solapur city and district.jpeg
BJP protests in Solapur city and district.jpeg

सोलापूर : शहर आणि जिल्ह्यातील मंदिरे उघडण्यासाठी भाजपाच्या वतीने बाळीवेस येथील मल्लिकार्जुन मंदिराबाहेर आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. पंढरपूर येथे भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी "देवही कोंडला'असे वक्तव्य त्यांनी केले. यावेळी पोलिस व श्रीकांत देशमुख यांच्यात बाचाबाची झाली. मोहोळ शहरातही तहसिलदारांना निवेदन देण्यात आले. जिल्ह्यात आज ठिकठिकाणी भाजपतर्फे निदर्शने करण्यात आली. 

दारूची दुकाने हॉटेल बार आधी सगळे सरकारने चालू केले आहे परंतु पोरं अशी लढत असताना आपले दुःख वेदना देवासमोर मांडण्यासाठी मंदिरे बंद केली आहे या मंदिरावर फूल-प्रसाद विक्रेते, आधी शेकडो लोकांची उपजीविका अवलंबून आहेत ते लोक उपाशी मरत आहेत परंतु सरकार दारूचे धंदे आणि डान्सबार चालू केले आहेत. यावेळी खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामीजी,आमदार विजयकुमार देशमुख अध्यक्ष विक्रम देशमुख, महापौर श्रीकांचना यन्नम सरचिटणीस बिज्जू प्रधाने, शशी थोरात, संघटन सरचिटणीस रूद्रेश बोरामणी, आध्यात्मिक समन्वयक मनोज हिरेहब्बू, नगरसेवक शिवानंद पाटील, सोनाली मुटकिरी, रामेश्वरी बिरू, अमर पुदाले, नागेश भोगडे, विनायक विटकर, वंदना गायकवाड, उपाध्यक्ष रेखा गायकवाड, प्रशांत फत्तेपूरकर, भूपती कमटम, चिटणीस अनिल कंदलगी, भैय्या बनसोडे, सोमनाथ रगबले उपस्थित होते. मंदिर बंद उघडे बार उद्धवा अजब तुझे सरकार अशा घोषणांनी मल्लिकार्जुन मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. टाळ मृदुंगासह जमलेले वारकरी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. 

महाराष्ट्रातील मंदिरे बंद आहेत तर बार आणि दारूची दुकाने उघडी आहेत आज महाराष्ट्रातील जनता कोरोना ने त्रस्त आहे त्यांचे दुःख त्यांच्या वेदना देवा पशी जाऊन व्यक्त करण्यासाठी मंदिरे उघडणे आवश्‍यक आहे मंदली मंदिरावर अवलंबून असणाऱ्या अनेक कुटुंबांची उपासमारी होत आहे परंतु या सरकारला सर्वसामान्य जनतेचे देणेघेणे नाही त्यामुळेच उद्धव सरकार मंदिरे उघडी करत नसल्याचा आरोप आमदार विजयकुमार देशमुख आणि खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी केला 

या आंदोलनावेळी नागेश सरगम, मंडल अध्यक्ष सचिन कुलकर्णी, सुधाकर नराल, सुनिल गौडगांव, राजकुमार पाटील, कोषाध्यक्ष गोविंद गवई, दत्तू पोसा, लक्ष्मीकांत दरक, अंबादास बिंगी, बाळासाहेब आळसंदे, बिपिन धुम्मा,सतीश महाले, संतोष चन्नापंतुलू, वेणूगोपाल जिल्लापंतुलू, अक्षय अंजिखाने, प्रवीण दर्गोपाटील, अमित गुंगे,बसवराज गदगे, जगन्नाथ चव्हाण, महेश अलकुंटे बसवराज डूमणे, केदार हब्बू, गोपी वड्डेपल्ली, लक्ष्मण गायकवाड, लक्ष्मीकांत गड्डम, डॉ. प्राची हुलसूरकर, छोटू गंजी, पुरुषोत्तम पोबत्ती, संदीप जाधव, शेखर जिल्ला, भिमाशंकर बिराजदार, भिमाशंकर जवळे, आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

मुख्यमंत्र्यांनी देव कोंडला : भाजपचे जिल्हाध्यक्ष देशमुख 


कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध मंदिरे गेल्या सात महिन्यांपासून बंद ठेवली आहेत. सरकारने ऑनलाक जाहीर केल्यानंतर दारुची आणि बिअरची दुकारने उघडली आहेत. परंतू मंदिर बंद ठेवली आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पंढरपूरचा पांडुरंग देखील कोंडून ठेवला आहे, आरोप भाजपचे जिल्हा अध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी केले. 
राज्यातील मंदिर दर्शनासाठी खुली करावीत या मागणीसाठी आज राज्यभरातील विविध मंदिरांसमोर भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. पंढरपुरातही विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करावे यामागणीसाठी भाजपच्या वतीने संत नामदेव पायरीजवळ आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना भाजपचे जिल्हा अध्यक्ष श्री. देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाना साधला. 
श्री.देशमुख म्हणाले की, पंढरपूर ही दक्षिण भारताची दक्षिण काशी आहे. परमात्मा पांडुरंगाचे मंदिर गेल्या सात महिन्यांपासून बंद आहे. केंद्र आणि राज्य सरकारने अनलॉक जाहीर केल्यानंतर अनेक अस्थापने, दुकानांसह दारुची आणि बिअरची दुकारने उघडण्यास परवानगी दिली आहे. याबरोबरच सार्वजनिक वाहतूक देखील सुरु केली आहे. मात्र मंदिरे का बंद ठेवली आहेत, असा प्रश्न उपस्थित करत मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरच्या पांडुरंगासह राज्यातील देव कोंडून ठेवले आहेत. सरकारच्या ताब्यातून देवांना मुक्त करण्यासाठी आंदोलन सुरु केले आहे. 
आंदोलक कार्यकर्त्यांनी संत नामदेव पायरी जवळ भजन करत सरकार विरोधात आपला आक्रोश व्यक्त केला. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ जगदाळे, शहर प्रसिध्दी प्रमुख शंतून दंडवते, महिला आघाडीच्या अध्यक्षा शंकुतला नडगिरे, माजी नगराध्यक्ष नवनाथ पवार, प्रणव परिचारक, माजी जिल्हा अध्यक्ष शिरीष कटेकर, अपर्णा तारके, वैशाली चंकेश्वरा, आनंद फाटे, विदुल आधटराव, कवडे महाराज, हणमंत पाटील, अनिल अभंगराव आदींसह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 


देशमुख आणि पोलिसांमध्ये बाचाबाची 

विठ्ठल मंदिर खुले करावे यामागणीसाठी जिल्हा भाजपने संत नामदेव पायरीजवळ मंगळवारी (ता. 13) सकाळी 11 वाजता आंदोलन करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार सकाळपासूनच भाजप कार्यकर्ते संत नामदेव पायरी जवळ जमा झाले होते. दरम्यान सुरक्षतेच्या कारणावरुन पोलिसांनी संत नामदेव पायरी जवळ आंदोलन करता येणार नाही, असे म्हणत कार्यकर्त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चिडलेल्या जिल्हा अध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी पोलिसांच्या या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त करत आंदोलन येथे करणार आम्हाला अटक करायची तर करा आम्ही जेलमध्ये जायला तयार आहे असे सांगत आक्रमक भूमिका घेतली. यावेळी पोलिस आणि त्यांच्यामध्ये बराचवेळ शाब्दीक बाचाबाची देखील झाली. 

मोहोळ येथे तहसिलदारांना निवेदन 
राज्यात कोरोना महामारीमुळे सर्वजनिक जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकरी, मजूर, कष्टकरी, छोटे उद्योग, टपरीधारक, फुल व हार विक्रेते, नारळ, उदबत्ती विक्रेते यांच्या हाताला काम नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येत आहे. त्यामुळे धार्मिक स्थळे त्वरीत खुली करावीत, अशा मागणीचे निवेदन मोहोळ भाजपाच्या वतीने तहसीलदार जीवन बनसोडे यांना देण्यात आले. यावेळी माजी तालुकाध्यक्ष सतीश काळे, अजय कुर्डे, सुरेश राऊत, रामचंद्र खांडेकर, सचिनानंद काळे, संजीव खिलारे, तानाजी दळवे, रामचंद्र शेळके, प्रभाकर दळवे, भिमराव सलगर आदींसह भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

संपादन : अरविंद मोटे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com