राज्य फुलपाखरू ओळख असलेल्या ब्ल्यु मॉरमॉनचे सोलापूरात आगमन 

blue mormon.jpg
blue mormon.jpg

सोलापूरः शहराच्या परिसरात या वर्षी पहिल्यांदाच महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू ब्लु मॉरमॉन चे अस्तित्व तीन ठिकाणी आढळले आहे. पक्ष्यांप्रमाणे हे फुलपाखरू देखील स्थलांतर करून पश्‍चिम घाटातून सोलापूरमध्ये येते. यावर्षी या फुलपाखरांची संख्या अधिक असल्याचे निसर्ग अभ्यासकांना आढळून आले आहे. 

नेचर कॉंन्झर्वेशन सर्कलचे कार्याध्यक्ष भरत छेडा यांची भेट घेण्यासाठी निसर्ग अभ्यासक ऍड. प्रकाश अभंगे आले असता. भरत छेडा यांना त्यांच्या सोसायटी मधील चंकेश्वर यांनी फोन करून पारवा घरात आला आहे असे सांगितले. चंकेश्वर यांच्या घरी जात असताना एका फुलांच्या झाडावर हालचाल दिसली. तेव्हा जवळ जाऊन पाहिले असता महाराष्ट्र राज्याचे राज्य फूलपाखरू ब्लू मॉर्मन असल्याची खात्री झाली. लगेच त्याचे फोटो आणि व्हिडीओ त्यांच्या मोबाईल मध्ये टीपले. विशेष म्हणजे याच भागातील सोसायटी मध्ये सलग तिसऱ्या दिवशी राज्य फूलपाखरूचे दर्शन झाले. 

महाराष्ट्र राज्याचे मानचिन्ह असलेले फुलपाखरू ब्ल्यू मॉरमॉन हे सध्या सोलापुरात दिसू लागले आहे. आपल्या भागात त्याचे प्रजनन झाल्याचे आता पर्यंत नोंदी नाहीत. पण पश्‍चिमघाटा कडून हे मोठ्या प्रमाणात स्थलांतर करत आपल्या भागाकडे पावसाळा ते हिवाळ्याच्या काळात दिसून येतात. हे फुलपाखरू साधारण बारा सेंटीमीटरचे असून ते उडत असताना एखादा लहान पक्षी उडते असा भास होतो. 
महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू म्हणून हे ओळखले जाते. पश्‍चिम घाटामध्ये सर्वसाधारणपणे या फुलपाखराचे वास्तव्य असते. मात्र सोलापूरभागात ते स्थलांतर करून येत असल्याचे दिसून येते. पुर्वी या फुलपाखराची संख्या अगदी फार कमी होती. क्वचितच ते दिसायचे. पण या महिन्यात हे फुलपाखरू अनेक ठिकाणी निसर्ग अभ्यासकांना पाहण्यास मिळाले आहे. देशातील सर्वात मोठे फुलपाखरू म्हणून सदर्न बडलिंग नावाचे फुलपाखरू मानले जाते. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचे मोठे फुलपाखरू म्हणून ब्लु मॉरमॉनचा उल्लेख केला जातो. शहरातील अंत्रोळीनगर, जुळे सोलापूर आदी भागात ब्लु मॉरमॉन सापडल्याच्या नोंदी झाल्या आहेत. 

निसर्ग अभ्यासकासाठी महत्वाची घटना 
गेल्या काही दिवसातील लॉकडाउनमुळे कमी झालेला निसर्गातील मानवी हस्तक्षेप देखील या फुलपाखराच्या अधिक संख्येने दिसण्यासाठी अप्रत्यक्ष कारण मानले जाते. ब्लु मॉरमॉनची सोलापूरातील हजेरी निसर्ग अभ्यासकासाठी महत्वाची आहे. 
- भरत छेडा, निसर्ग अभ्यासक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com