ब्रेकींग : आयपीएल सट्ट्यातील 38 लाखांची रोकड जप्त, एकास अटक 

अमोल व्यवहारे
Tuesday, 1 December 2020

या कारवाईत शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिपककुमार घनशाम जोशी रा. जोशी मोहल्ला, पिंपलगाव, तहसिल चानसमा, जिल्हा पाटण, राज्य गुजरात सध्या रा. 195, उमा नगरी भाग 5, जुनी मिल कंम्पौड, सोलापूर यास अटक करण्यात आलेली असून त्यास एक दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. आयपीएल सट्ट्याच्या कारवाईत आतापर्यंत सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोलापूर, कलबुर्गी, नागपूर येथून 11 आरोपींना अटक केली असून सुमार 1 कोटी 30 लाख 47 हजार 60 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

सोलापूर: आयपीएल क्रिकेट सट्ट्यातील रोख 38 लाख 50 हजार 300 रुपयांची रोकड शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त करून एकास अटक केली. ही कारवाई पोलिसांनी सोमवारी रात्री जुनी मिल कंम्पौडमधील उमा नगरीतील एका घरामध्ये केली. 

हेही वाचाः महिलेसह पतीवर चाकू हल्ला 

या कारवाईत शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिपककुमार घनशाम जोशी रा. जोशी मोहल्ला, पिंपलगाव, तहसिल चानसमा, जिल्हा पाटण, राज्य गुजरात सध्या रा. 195, उमा नगरी भाग 5, जुनी मिल कंम्पौड, सोलापूर यास अटक करण्यात आलेली असून त्यास एक दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. आयपीएल सट्ट्याच्या कारवाईत आतापर्यंत सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोलापूर, कलबुर्गी, नागपूर येथून 11 आरोपींना अटक केली असून सुमार 1 कोटी 30 लाख 47 हजार 60 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

हेही वाचाः आळंदी वारीसाठी परवानगी द्यावीः अखिल भारतीय वारकरी मंडळाची मागणी 

शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावणारे सोलापुरातील रॅकेट शोधून काढून सोलापूर, कलबुर्गी, नागपूर याठिकाणी कारवाई करीत मुख्य बुकीसह 11 जणांना अटक केली. या गुन्ह्याचा तपास करताना या सट्ट्याच्या व्यवसायातून मिळवलेली व देवाण घेवाण करण्यासाठी लागणारी रक्‍कम ही उमा नगरीत राहणाऱ्या दिपककुमार जोशी याच्या घरात असल्याची माहिती मिळली होती. त्यानुसार पोलिसांनी सोमवारी रात्री उमा नगरीतील जोशी याच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरात रोख 38 लाख 50 हजार 300 रुपये मिळून आले. तसेच 22 हजार 700 रुपये किंमतीच्या नोटा मोजण्याच्या दोन मशिन, फेक नोट डिटेक्‍टर मशिन अशी साधने तसेच कागदपत्रेदेखील मिळून आली. 
ही कारवाई पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे, पोलिस उपायुक्‍त बापू बांगर, सहायक पोलिस आयुक्‍त अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजय साळुंखे, सहायक पोलिस निरीक्षक अजित कुंभार, सचिन बंडगर, हवालदार औंदुबर आटोळे, पोलिस नाईक जयसिंग भोई, पोलिस शिपाई संजय साळुंखे, सिध्दाराम देशमुख, सुहास अर्जुन, नेताजी गुंड, महिला पोलिस शिपाई आरती यादव यांनी केली.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Breaking: 38 lakh cash seized in IPL betting, one arrested