ब्रेकिंग! सोलापूर शहरातील सम-विषमचा नियम रद्द 

तात्या लांडगे
Tuesday, 4 August 2020

ठळक बाबी... 

 • उद्यापासून (बुधवारी) शहरातील दोन्ही बाजूची दुकाने राहतील सुरु 
 • सोमवार ते शनिवारपर्यंत सकाळी नऊ ते रात्री सात वाजेपर्यंत दिली वेळ 
 • रविवारी सर्व दुकाने राहणार बंद; महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांचे आदेश 
 • महापालिका हद्दीतील डेअरी, दुध विक्री दुकाने रविवारी सात ते रात्री सातपर्यंत सुरु राहणार 
 • अत्यावश्‍यक सेवा देणारे उपक्रम यापूर्वी दिलेल्या आदेशानुसार सुरु ठेवण्याचे आदेश 
 • सलून, स्पा, केश कर्तनालये, मटन व्रिकीची दुकाने व होम डिलिवरी देणारी हॉटेल्स्‌, किचन सेवा चालू राहतील 

सोलापूर : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने केंद्र व राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सोलापूर शहरातील दुकाने सम-विषम पध्दतीने सुरु ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी दिले होते. मात्र, चेंबर ऑफ कॉमर्सने हा नियम रद्द करण्याची मागणी केली होती. त्याबद्दल आमदार सुभाष देशमुख यांनीही महापौर श्रीकांचना यन्नम आणि आयुक्‍त शिवशंकर यांच्याशी सोमवारी (ता. 3) चर्चा केली होती. त्यानंतर आयुक्‍तांनी आज नवे आदेश काढत तो नियम रद्द केला. 

नव्या आदेशानुसार बुधवारपासून (ता. 5) शहरातील दोन्ही बाजूची सर्व दुकाने सकाळी नऊ ते रात्री सात वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. मात्र, रविवारी सर्वच दुकाने बंद ठेवल्याचे आदेश महापालिका आयुक्‍तांनी दिले. त्यानुसार आता रविवारी दुध विक्रीची दुकाने आठवड्यातील इतर दिवसांच्या वेळेनुसार सकाळी सात ते रात्री सातपर्यंत सुरु राहणार आहेत. याशिवाय मॉल्स्‌, हॉटेल, केश कर्तनालय यासह अन्य आस्थापनांसाठी यापूर्वीचे आदेश कायम ठेवण्यात आले आहेत. 

ठळक बाबी... 

 • उद्यापासून (बुधवारी) शहरातील दोन्ही बाजूची दुकाने राहतील सुरु 
 • सोमवार ते शनिवारपर्यंत सकाळी नऊ ते रात्री सात वाजेपर्यंत दिली वेळ 
 • रविवारी सर्व दुकाने राहणार बंद; महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांचे आदेश 
 • महापालिका हद्दीतील डेअरी, दुध विक्री दुकाने रविवारी सात ते रात्री सातपर्यंत सुरु राहणार 
 • अत्यावश्‍यक सेवा देणारे उपक्रम यापूर्वी दिलेल्या आदेशानुसार सुरु ठेवण्याचे आदेश 
 • सलून, स्पा, केश कर्तनालये, मटन व्रिकीची दुकाने व होम डिलिवरी देणारी हॉटेल्स्‌, किचन सेवा चालू राहतील 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Canceled even-odd rule in the solapur city