Gram Panchayat Results : भालके गटाचा धुव्वा ! माचणूरची सत्ता आवताडे गटाच्या ताब्यात 

MachanurGP
MachanurGP

ब्रह्मपुरी (सोलापूर) : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तसेच तीर्थक्षेत्र म्हणून परिचित माचणूर (ता. मंगळवेढा) येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांच्या कारभाराला कंटाळून मतदारांनी सत्तेपासून दूर ठेवत आवताडे गटाच्या श्री सिध्देश्वर ग्रामविकास परिवर्तन आघाडीस सर्वच 9 जागांवर विजय मिळवून भालके गटाचा धुव्वा उडवला. प्रथमच या निवडणुकीत सर्व स्थानिक गाव पुढाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांपासून फारकत घेत विरोधात मोट सांधून आवताडे गटाशी आघाडी करून भालके गटाचा सुफडा साफ करीत एकहाती सत्ता मिळवली. 

माचणूर गावचे सरपंचपदाचे आरक्षण निवडणुकीनंतर जाहीर होणार असून दोन्हीही गटांनी निवडणूक अत्यंत अटीतटीची, चुरशीची व प्रतिष्ठेची केली होती. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी गटाचे सरपंच सुनील डोके यांचे वर्चस्व होते. गेल्या पाच वर्षात सत्ताधाऱ्यांच्या एकहाती नेतृत्वाच्या कारभाराला कंटाळून कोणतीही विकासकामे केली नाहीत या कारणारून मतदारांनी भालके गटास झुंज दिली असता मतदारांनी आवताडे गटाच्या पॅनेलला विजयाची मूहूर्तमेढ रोवून सलामी दिली. सर्व गटाच्या नेत्यांनी आगामी मंगळवेढा - पंढरपूर विधानसभेची पोटनिवडणूक व संत दामाजी साखर कारखान्याची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ही ग्रामपंचायतीची निवडणूक प्रतिष्ठेची व राजकीयदृष्ट्या महत्वाची केली होती. त्यामुळे तालुक्‍यातील विविध पक्षांच्या राजकीय नेत्यांनी यावेळच्या निवडणुकीत जोराचे प्रयत्न करत लक्ष घातले होते. विजयासाठी दोन्हीही गटांनी दावा केला होता. 

माचणूर ग्रामपंचायतीवर आतापर्यंत सुनील डोके, विठ्ठल डोके, धनंजय गायकवाड यांच्या सत्तेला सुरुंग लावला असून, अवताडे गटाच्या दामाजी शुगरचे संचालक राजीव बाबर, जनार्दन शिवशरण, आबासाहेब डोके, बबन सरवळे, जालिंदर डोके, विलास डोके, सुनील डोके, लिंबाजी डोके, लाडिक डोके आदींनी एकत्र येऊन तिन्हीही प्रभागात कडवी झुंज देत सत्ताधाऱ्यांना खुर्चीपासून दूर ठेवत सत्तास्थापनेत विजय मिळवला आहे. 

ही निवडणूक बिनविरोध होत असताना विरोधकांनी काही जागांचा अट्टहास धरला. माचणूर हे गाव तीर्थक्षेत्र असल्यामुळे विविध विकासकामे करणार असून मतदारांनी विश्वास टाकत आमच्या गटास निवडून दिले आहे. सर्वांना विश्वासात घेऊन गावचा विकास करणार आहोत. 
- जनार्दन शिवशरण, 
विजेता गट प्रमुख 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com