"डोकेदुखी' गायब, दवाखान्याचा पडला विसर... मेडीकलही लगेच सापडले  VIDEO

विजयकुमार सोनवणे
मंगळवार, 24 मार्च 2020

घराबाहेर न पडणे हाच एकमेव उपाय 
संचारबंदीच्या कालावधीत घराबाहेर न पडणे हाच खरा प्रादुर्भाव रोखण्याचा महत्त्वाचा उपाय आहे. या संदर्भात प्रशासनाकडून वारंवार सूचना दिल्या जात आहेत, आवाहन केले जात आहे. मात्र सोलापूरकरांनाकडून अजुनही म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळ येत्या काही दिवसांत ही कारवाई आणखी जोमाने करण्याची तयारी पोलिस विभागाने केली आहे. 

सोलापूर : साहेब, डोके दुखायला लागले आहे, गोळी घ्यायला चाललो आहे.... दवाखान्याला चाललो आहे.... साहेब आमच्याकडचे दुकाने बंद आहेत.... संचारबंदीच्या कालावधीत रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्यांकडून दिल्या जाणाऱ्या या उत्तरांनीच त्यांना अडचणीत आणले. पोलिसांनी त्यांचा कावेबाजपणा ओळखला आणि पोलिस विभागाचा प्रसाद मिळाला... पहिल्याच प्रसादात अनेकांची डोकेदुखी क्षणात गायब झाली, दवाखाना विसरला आणि मेडीकल दुकानही लगेच सापडले. अनेकवेळा विनंत्या करूनही रस्त्यावर मोकाटपणे फिरणाऱ्यांची डोकेदुखी पोलिसांनी आपल्या पद्धतीने प्रसाद देऊन थांबवली. 

प्रतिमेत याचा समावेश असू श्‍ाकतो: एक किंवा अधिक लोक, बाहेरील आणि खाद्य
वेळ संपल्यावरही सुरु ठेवण्यात आलेली मरिआई चौक परिसरातील मार्केट बंद करताना पोलिस

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल राज्यात संचारबंदीची घोषणा केली. त्यानुसार जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी ग्रामीण भागासाठी तर पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पोलिस आयुक्तालय हद्दीसाठी संचारबंदीचे आदेश काढले. त्यानुसार नागरिकांनी घरात थांबणे आवश्‍यक होते. मात्र शहराच्या विविध भागात रस्त्यांवर गर्दी झाल्याचे दिसून आले. विशेषतः मध्यवर्ती भागातील छत्रपती शिवाजी चौक परिसर, दमाणी नगर, मरिआई चौक पोलिस चौकी परिसर, देगाव, निराळे वस्ती, एसटी स्थानक परिसर या भागात नागरीक खुलेआम हिंडत होते. या सर्व ठिकाणी पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली, त्यानंतर नागरिक पांगले. 

प्रतिमेत याचा समावेश असू श्‍ाकतो: 1 व्‍यक्ती, झाड, बूट आणि बाहेरील
विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांना मिळाला पोलिसांचा असा लाठीचा प्रसाद 

अनेक ठिकाणी मंड्या गर्दीने फुलल्या होत्या. त्या ठिकाणची गर्दी हटविण्यात आली. रस्त्यावर थांबून गप्पा मारणाऱ्यांना लाठीचा प्रसाद मिळाला. अनेकांनी पोलिसांना न पटणारी कारणे सांगितली, अशा सर्वांना पोलिसांचा प्रसाद खायला मिळाला. काल काही ठिकाणी पोलिसांनी केलेल्या कारवाईचे व्हिडीओ आणि छायाचित्रे सोशल मिडीयावरून प्रसिद्ध झाल्याने अनेकांनी घरी बसणे पसंत केले. पण काहीच काम नसताना विनाकारण रस्त्यावर हिंडणाऱ्यांचे प्रमाण आजही लक्षणीय होते. रस्त्यावर हिंडणाऱ्यांकडून सांगण्यात येणारी कारणेही न पटणारी होती. मोकाट फिरणाऱ्यांना सुरु झालेली "डोकेदुखी' थांबविण्यासाठी पोलिसांनी जालीम उपाय केला, त्यामुळे आता किमान एक महिनाभर तरी त्यांना डोकेदुखी जाणवणार नाही, मात्र पाठदुखी मात्र सतावत राहील हे नक्की. 

प्रतिमेत याचा समावेश असू श्‍ाकतो: एक किंवा अधिक लोक, मोटारसायकल आणि बाहेरील
पोलिसांच्या वाहनांवरही जंतूनाशक अौषधांची फवारणी करण्यात आली

चला पोलिसांच्या कारवाईचा पाहूयात  VIDEO


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: carfew in solapur city