cctv CHOR
cctv CHOR

अरारा ! चोराने लांबविले सीसीटीव्ही अन्‌ कॅश लॉकर 

सोलापूर : होटगी रोडवरील सहारा नगरातील अरजाक मोटर्स गॅरेज व ई-कॉम एक्‍स्प्रेस प्रा. लि. कुरिअर सर्व्हिस सेंटरचे शटर उचकटून चोरट्याने तीन लाख 91 हजार 319 रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना शुक्रवारी (ता. 21) मध्यरात्री घडली. चोरट्याने सीसीटीव्ही आणि कॅश लॉकरच काढून नेल्याने पोलिसांनी आश्‍चर्य व्यक्‍त केले आहे. 


कुरिअर सेंटरचे सुपरवायझर शशिकांत तेरकर हे शुक्रवारी शटर लावून गेले होते. शनिवारी (ता. 22) सकाळी 7 वाजता एक्‍झिकेटिव्ह योगेश संगमवार हे सेंटरवर पोहचले. त्यावेळी शटरची डावी बाजू व लॉक उचकटलेले दिसले. त्यांनी फोनवरुन सगळा प्रकार व्यंकटेश गोपीनाथ बडदापुरे यांना सांगितला. त्यावेळी बडदापुरे घटनास्थळी पोहचले आणि दुकानात प्रवेश केला. त्यावेळी सेंटरमधील दोन लाख 15 हजार 319 रुपयांची रोकड, 10 हजारांच्या किंमतीचे कॅश लॉकर, सहा हजार रुपयांचा सीसीटीव्ही कॅमेरा असा मुद्देमाल चोरीला गेल्याची फिर्याद विजापूर नाका पोलिसांत दिली. तर याच सर्व्हिस सेंटरमधील अब्दुलरझाक हारुण शेख यांच्या मोटार गॅरेजमध्येही चोरी झाल्याचे समजले. गॅरेजमधील दिड लाख रुपयांच्या किंमतीची चारचाकी (एमएच-01, पीए-8236) आणि दहा हजार रुपये किंमतीच्या दोन बॅटऱ्या असा एक लाख 60 हजारांचा मुद्देमाल चोरट्याने चोरल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. सहायक पोलिस निरीक्षक रोहित दिवसे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com