Kisan Sanman.
Kisan Sanman.

केंद्र शासन करणार बार्शी तालुक्‍यातील "प्रधानमंत्री किसान सन्मान'च्या अपात्र शेतकऱ्यांकडून दीड कोटी वसूल ! 

बार्शी (सोलापूर) : देशात सुरू असलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतून बार्शी तालुक्‍यातील 1 हजार 508 शेतकऱ्यांनी आयकर भरत असताना केंद्र शासनाच्या या योजनेचा 1 कोटी 50 लाख 92 हजार रुपयांचा लाभ घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. आता संबंधित अपात्र शेतकऱ्यांना वसुलीच्या नोटिसा देण्यात आल्या असून, 20 लाख रुपये वसूल केले असल्याची माहिती नायब तहसीलदार संजीवन मुंढे यांनी दिली. 

बार्शी शहर अन्‌ तालुक्‍यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे 47 हजार 100 लाभार्थी असून, त्यापैकी 1 हजार 508 शेतकरी आयकर भरत असतानाही या योजनेचा लाभ घेतला आहे. केंद्र सरकारने आधार कार्डद्वारे तपासणी केल्यानंतर ही माहिती उजेडात आली आहे. 

वर्षामध्ये योजनेतून चार महिन्याला दोन हजार रुपयांप्रमाणे सहा हजार रुपयांचा शेतकऱ्यांना लाभ होतो. स्वतः व पत्नीच्या नावे शेती वेगवेगळी असणे, घर बांधलेले असणे, मयत असणे, आयकर भरत असणे अशांमधून ही नावे शासनास आढळली आहेत. 

केंद्र शासनाने शहर व तालुक्‍यातील आयकर भरत असलेल्या शेतकऱ्यांची यादीच तहसील कार्यालयात पाठवून त्यांच्याकडून रक्कम वसूल करण्याचे आदेश देताच 20 लाख रुपये वसूल झाले असून उर्वरित वसुली तलाठ्यांमार्फत सुरू आहे. तालुक्‍यातील ज्या 23 जणांनी एक हप्ता, दोन हप्ते उचलले अशांकडून 1 लाख 90 हजार रुपये वसूल केले आहेत तर या योजनेत 29 जण अपात्र ठरले आहेत. 

आयकर भरत असताना योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांचे गाव व नाव 
आगळगाव 10, अलिपूर 1, आळजापूर 6, अंबाबाईवाडी 3, अरणगाव 4, बाभळगाव 12, बळेवाडी 6, बार्शी 29, बावी 11, बेलगाव 2, भानसळे 5, भातंबरे 13, भोईंजे 10, भोयरे 3, बोरगाव झाडी 4, चारे 11, चिखर्डे 32, चिंचखोपण 3, चिंचोली 5, चुंब 2, दडशिंगे 8, दहिटणे 15, देवगाव 12, धामणगाव 13, धानोरे 8, ढेंबरेवाडी 5, ढोराळे 9, धोत्रे 9, गाडेगाव 4, घाणेगाव 15, घारी 6, घोळवेवाडी 4, गोरमाळे 15, गुळपोळी 21, हळदुगे 6, हत्तीज 2, हिंगणी 6, इंदापूर 8, इर्ले 4, इर्लेवाडी 7, झानपूर 5, जामगाव 22, जवळगाव 3, ज्योतिबाचीवाडी 1, कळंबवाडी 6, काळेगाव 24, कारी 24, कासारी 15, कासारवाडी 11, काटेगाव 9, कव्हे 15, खडकलगाव 7, खडकोणी 4, खामगाव 17, खांडवी 25, कोरेगाव 5, कोरफळे 32, कुसळंब 6, लाडोळे 6, लक्ष्याचीवाडी 9, महागाव 5, मळेगाव 23, मालवंडी 21, ममदापूर 8, मांडेगाव 7, मानेगाव 19, मिर्झनपूर 6, तडवळे 18, मुंगशी 17, नागोबाचीवाडी 18, नांदणी 10, नारी 14, नारीवाडी 3, निंबळक 7, पांढरी 9, पानगाव 32, पांगरी 31, पाथरी 4, फपाळवाडी 10, पिंपळगाव धस 12, पिंपळगाव पान 5, पिंपळगाव पां 9, पिंपळवाडी 6, पिंपरी रातंजन 2, पिंपरी पान 8, पुरी 14, राळेरास 13, रस्तापूर 14, रातंजन 12, रऊळगाव 3, रुई 9, साकत 23, संगमनेर 10, सर्जापूर 4, सारोळे 17, सासुरे 27, सौंदरे 18, सावरगाव 8, शेलगाव मा 14, शेलगाव आर 23, शेळगावव्हळे 6, शेंद्री 14, शिराळे 9, श्रीपतपिंपरी 26, सुर्डी 34, ताडसौंदणे 3, तांबेवाडी 7, तांदूळवाडी 16, तावडी 10, तुर्कपिंपरी 23, उक्कडगाव 6, उंबरगे 3, उंडेगाव 12, उपळाई ठोंगे 85, उपळे दुमाला 17, वैराग 17, वाघाचीवाडी 3, वालवड 6, वाणेवाडी 2, वांगरवाडी 18, यावली 29, येळंब 13, झाडी 4, झरेगाव 6 याप्रमाणे 1 हजार 508 जणांकडून रक्कम वसूल केली जाणार आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com