कोरोना संकटानंतर चिकन व अंड्याचे भाव वधारले ; आणखी तेजीची चिन्हे 

eggs.jpg
eggs.jpg

केतूर (सोलापूर) ः कोरोनाच्या संकटानंतर पुन्हा एकदा अंडी व चिकनचे भाव वाढले असून बाजारपेठेत या पुढील काळात देखील दोन्ही वस्तुंचे भाव वाढतील असा अंदाज व्यक्त केला जाऊ लागला आहे. 

कोरोना महामारी संकटाच्या सुरुवातीच्या काळात चिकनमुळे कोरोनाचा प्रसार होतो.अशा अफवा जोरकसपणे पसरल्यामुळे चिकन उद्योगाला याचा जोरदार फटका बसला होता. त्यामुळे कोंबडीची पिले तसेच अंडी जेसीबीच्या साह्याने खड्डे करून त्यात पुरण्याची वेळ कुकूटपालन व्यवसायीकांवर आली होती. मात्र "प्रत्येकाचे दिवस येतात" त्याचा प्रत्यय सध्या येत असून कोरोना होऊ नये म्हणून रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी डॉक्‍टर मंडळीकडूनच अंडीचा आहार करण्यास सांगितले जात आहे. या सोबत इतर कारणाने देखील पुन्हा एकदा बाजारात मांसाहाराला मागणी वाढली आहे. त्यामुळे चिकन व अंडी यांना पुन्हा एकदा चांगले दिवस आले आहेत. 

सध्या किरकोळ बाजारात अंडे प्रतिनग 7 रुपये तर, चिकन 180 ते 190 रुपये किलो या दराने विकले जात आहे. यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्‍यता चिकन विक्रेत्यांनी केली आहे. चिकनचे दर वरचेवर वाढत असल्याने चिकन उद्योगाला पुन्हा एकदा नवी झळाळी आल्याचे यानिमित्ताने पुढे आले आहे. 
2006 साली बर्ड फ्लू साथीच्या रोगाने नंतर आता कोरोना संसर्गाचा मोठा फटका कोंबड्यांना बसला चिकन पासून कोरोनाचा संसर्ग होत असल्याच्या अफवा सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने जानेवारी महिन्यापासून चिकन,व अंडयांना मागणीच नव्हती.त्यावेळी कुकुटपालन चालकांनी स्किम काढून कोंबड्या विकल्या तर काहींनी दहा रुपये नगाने कोंबड्याची विक्री केली. 
काही दिवसापूर्वी केवळ पसरलेल्या अफवेमुळे मागणीच नसल्याने चिकनचे दर एकदम घसरले होते त्यामुळे चिकन उद्योग संकटात सापडला होता परंतु पुन्हा एकदा रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी चिकन व अंडी खाण्याचा सल्ला डॉक्‍टरमंडळी जाऊ लागल्यापासून कुक्कुटपालन व्यवसायाला मात्र "अच्छे दिन" आले आहेत.चिकनला मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे.उत्पादनात झालेली घट व मागणीत झालेली वाढ यामुळे अंडी व चिकनचे दर वरचेवर वाढत असल्याने खवय्यांच्या खिशाला मात्र "चाट" बसत आहे.मटन,मासे यापेक्षा चिकनचे दर त्यामानाने कमी असल्याने ग्राहकांचा ओढा चिकनकडे वाढल्याचे दिसून येत आहे. 

पुरवठा कमी झाला 
सध्या अंड्याला मागणी वाढली आहे परंतु पुरवठा कमी होत आहे त्यातच अंड्याचे भाव वाढले आहेत या पुढेही भाव वाढण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. 
-सिंकदर तांबोळी,अंडे विक्रेता,केतूर. 

जादा दराने खरेदी 
दोन महिन्यापूर्वी 5 रुपयाला एक अंडे मिळत होते याचा दर आता 7 रुपये असा झाला आहे वरचेवर अंड्याचे दर वाढत असल्याने अंडी खाणेही अवघड झाली आहे. 
- रविंद्र चव्हाण,ग्राहक. 

मटनाचे दर वाढले 
सध्या गावरान कोंबड्या खाण्यास मिळणे अवघड झाल्याने व मटणाचे दर मोठ्या प्रमाणावर वाढल्याने चिकनशिवाय पर्याय नसल्याने नाईलाजाने चिकन खावे लागत आहे. 
- रवींद्र विघ्ने,ग्राहक  
 

संपादनः प्रकाश सनपूरकर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com