का केली चिकन विक्रेत्यास मारहाण?

Chicken Dealer Beaten in Surrounding
Chicken Dealer Beaten in Surrounding

टेंभुर्णी (सोलापूर) : "खराब चिकन का दिले' असे म्हणून दोघा जणांनी चिकन विक्रेत्यास लाथाबुक्‍क्‍यांनी व वायरने मारहाण करून त्यांच्याकडील 10 हजार रुपये किमतीचा एक मोबाईल व 22 हजार 500 रुपये, असे एकूण 32 हजार 500 रुपये किमतीचा ऐवज जबरदस्तीने काढून घेतला. मंगळवारी सकाळी सव्वानऊच्या सुमारास ही घटना घडली असून दोघांच्या विरोधात टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 
याविषयी पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी, टेंभुर्णी शहरातील जुन्या सोलापूर-पुणे महामार्गावरील हॉटेल विश्‍वजितच्या बाजूस असलेल्या अमन चिकन सेंटरचे मालक इम्तियाज इस्माईल सय्यद (वय 37) यांना सूरज बाळू शिंदे (वय 30), सोमनाथ विठ्ठल खरात (वय 30, दोघे रा. टेंभुर्णी) हे काल "खराब चिकन का दिले' असे म्हणाले. त्यावेळी सय्यद हे "याबदल्यात दुसरे चिकन बदलून देतो' असे म्हणत असताना सूरज शिंदे याने लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. तसेच त्यांच्याबरोबर दुसऱ्या दुचाकीवरून आलेल्या अनोळखी 30 ते 35 वयोगटातील दोन तरुणांपैकी एकाने त्याच्याकडील वायरने डोक्‍यात मारहाण केली. या मारहाणीत सय्यद हे रक्तबंबाळ झाले. तर दुसऱ्याने सय्यद यांच्या पॅंटच्या खिशातील 22 हजार 500 रुपये व 10 हजार रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल, असा एकूण 32 हजार 500 रुपये किमतीचा ऐवज काढून घेतला. यावेळी लोकांची गर्दी वाढू लगल्यानंतर सर्वजण पळून गेले. 
टेंभुर्णी पोलिस ठाण्यात इम्तियाज सय्यद यांनी फिर्याद दाखल केली असून सूरज बाळू शिंदे यास सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी अटक केली आहे. यातील उर्वरित आरोपी फरार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com