"व्हर्च्युअल रॅली'मधून लुटला मोहोळवासीयांनी शरद पवारांच्या वाढदिवसाचा आनंद !

Power_80
Power_80

मोहोळ (सोलापूर) : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने देशाचे नेते, माजी केंद्रीय कृषी व संरक्षणमंत्री खासदार शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमीत्त आयोजित डिजिटल व्हर्च्युअल रॅलीमध्ये आमदार यशवंत माने, माजी आमदार राजन पाटील यांच्यासह शेकडो नागरिक सहभागी झाले होते. 

मोहोळ नागरी पतसंस्थेच्या सभागृहात या डिजिटल व्हर्च्युअल रॅलीचे प्रक्षेपण ठेवण्यात आले होते. या रॅलीचे प्रास्ताविक करताना महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी सांगितले, की या सभागृहात प्रत्यक्षात मान्यवरांसह 200 जण उपस्थित असतील. पण प्रत्यक्षात महाराष्ट्रातील 36 जिल्हे, 350 पेक्षा जास्त तालुके, सात केंद्रांतून लाखोजण या रॅलीमध्ये सहभागी असून, शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसाचा आनंद घेत आहेत. 

सुरवातीला सुप्रिया सुळे यांच्यासह पाच महिलांनी श्री. पवार यांचे औक्षण केले. श्री. पवार यांनी राबविलेल्या महिला सक्षमीकरण अंतर्गत महिलांना विशेष अधिकार देणाऱ्या धोरणाचा आज खऱ्या अर्थाने रौप्यमहोत्सव साजरा होत असल्याचा उल्लेख या वेळी करण्यात आला. या वेळी राष्ट्रवादीच्या विविध नेत्यांनी अनुभव कथन केले. त्याचबरोबर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अधिकृत ऑनलाइन वेबसाईटचे उद्‌घाटन या वेळी करण्यात आले. व्यासपीठावर प्रदेक्षाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल, अनिल देशमुख, रामराजे निंबाळकर, नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे, हसन मुश्रीफ, सुनील तटकरे आदी उपस्थित होते. 

मोहोळ नगरीतीत या डिजिटल रॅलीमध्ये आमदार राजन पाटील यांच्यासह तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे, नानासाहेब डोंगरे, शहाजहान शेख, सभापती रत्नमाला पोतदार, उपसभापती अशोक सरवदे, सिंधू वाघमारे, दीपक माळी, शशिकांत पाटील, उपनगराध्यक्ष बापू डोके, संतोष वायचळ, ब्रह्मदेव भोसले, नागनाथ सोनवणे, राजेश सुतार, नागेश बिराजदार, जयवंत गुंड, बंडू देशमुख, सज्जन पाटील, हेमंत गरड, धनाजी गावडे, मिलिंद अष्टुळ, संतोष सुरवसे, संतोष सोलनकर, प्रशांत बचुटे, भैय्या कोरे, दादा ओहोळ, नागेश पुराणिक आदींसह शेकडो नागरिक उपस्थित होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com