सांगोला शहर कोरोनामुक्तीचा पॅटर्न ठरलाय कौतुकास्पद 

सांगोला शहर कोरोनामुक्तीचा पॅटर्न ठरलाय कौतुकास्पद 

सांगोला(सोलापूर): सांगोला नगरपालिकेने कोरोना काळात राबवलेल्या पॅटर्न राबवल्याने शहरात एकही कोरोना बाधित रुग्ण नाही ही बाब समाधानकारक आहे अशा शब्दात आमदार शहाजीबापू पाटील यांच्यासह माजी आमदार गणपतराव देशमूख व दीपकराव साळुंखे पाटील आदींनी कौतुक केले आहे. 

कोरोना काळात केलेल्या कामाचा आढावा व आगामी काळात करावयाच्या उपाययोजना यासाठी काल सोमवार (ता. 22) रोजी नगरपालिका सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली. 
या बैठकीमध्ये कोरोना काळात करण्यात आलेल्या उपाययोजनाची माहिती देण्यात आली. जनजागृतीपर गीते, आयएफएल आणि सारी आजाराचे सर्वेक्षण करण्यात आले. शहरातील 38 हजार नागरिकांचे थर्मल व ऑक्‍सिजन स्क्रिनिंग पूर्ण केले. संस्थात्मक व होम विलगिकरणाची प्रभावी अंमलबजावणी झाली. लॉकडाउन काळात डोअर टू डोअर भाजीपाला विक्री प्रयोग करण्यात आला. शहरातील प्रमुख दुकाने व चौकात नगरपालिका कर्मचाऱ्यांकडून सोशल डिस्टनसिंगवर कडक नियंत्रण ठेवण्यात आले. गरजूंना जीवनावश्‍यक वस्तूंच्या किट वाटप, दिव्यांग्याचा खात्यावर दोन हजार रुपये जमा करणे, सफाई कामगारांचे ध्यान व योग वर्ग झाले. या कामगारांना त्यांना आर्सेनिक अल्बमचे गोळ्यांचे वाटप झाले. शहरात वेळोवेळी निर्जंतुकीकरण करण्यात आले. शहराच्या विविध भागात फिव्हर क्‍लिनिक व हॅन्ड वॉश सेंटर उभारण्यात आली. घरपोच सेवेचे नगरसेतु अँप कार्यरत झाल्याने नागरिकांना त्याचा उपयोग झाला. नगरपालिकेत ऍटोमॅटिक सॅनिटायझर मशीन बसविली आहे. 

या बैठकीला माजी आमदार गणपतराव देशमुख, माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील, माजी नगराध्यक्ष प्रबुद्धचंद्र झपके, रफिक नदाफ, भाऊसाहेब रुपनर, नगराध्यक्षा राणी माने, उपनगराध्यक्षा भामबाई जाधव, गटनेते आनंद माने, सचिन लोखंडे, मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्यासह विविध समित्यांचे सभापती, नगरसेवक, नगरसेविका, तसेच विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सुरुवातीला मान्यवरांचे स्वागत नगराध्यक्षा राणी माने यांनी केले. प्रास्ताविक मुख्याधिकारी केंद्रे यांनी केले. 
यावेळी आमदार शहाजीबापू पाटील यांनी शहराच्या विकासासाठी लागणाऱ्या निधीसाठी व एमजीपीची योजना मार्गी लावण्यासाठी संबंधीत खात्याकडे पाठपुरावा करून लवकरच निधीची उपलब्धता केली जाईल अशी माहिती दिली. यावेळी माजी आमदार गणपतराव देशमुख व माजी आमदार दीपक साळुंखे यांनी कोरोना काळात नगरपालिका प्रशासनाने उत्कृष्ट काम केल्यामुळेच एकही रुग्ण आढळून आला नाही त्याबद्दल कौतुक केले. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आगामी काळात लागणार निधी खेचून आणण्यासाठी संयुक्तिक प्रयत्न केले जातील असे सांगितले. या बैठकीत नगरसेवक अस्मिर तांबोळी, नगरसेवक चेतनसिंह केदार, सुरज बनसोडे, जुबेर मुजावर, गजानन बनकर सुरेश माळी, अनुराधा खडतरे, स्वाती मगर आदींनी मनोगत व्यक्त केले.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com