महिला सक्षमीकरणाचे 'जवळा मॉडेल' आदर्शवत : रुपाली चाकणकर 

sangola mahila.jpg
sangola mahila.jpg

सांगोला,(सोलापूर): राजकारण व इतर क्षेत्रासह महिला आर्थिकदृष्ट्याही सक्षम झाल्या पाहिजेत. यासाठी बचत गटाच्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षा जयमाला गायकवाड यांनी जवळा परिसर व संपूर्ण सांगोला तालुक्‍यात केलेले कार्य खूप कौतुकास्पद आहे. त्यांनी महिलांना स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी जवळा परिसरात बचत गटाच्या माध्यमातून छोट्या-मोठ्या उद्योग व्यवसायाला दिलेली चालना पाहता महिला सक्षमीकरणाचे हे 'जवळा मॉडेल' संपूर्ण राज्यासाठी आदर्श असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांनी केले. 

राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या बुथ कमिटी आढावा बैठकीदरम्यान जवळा (ता. सांगोला) येथे त्या बोलत होत्या. राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या वतीने बूथ कमिटी स्थापनेचा शुभारंभ निमित्ताने रूपाली चाकणकर यांनी महाराष्ट्रभर आढावा घेत आहेत. 

सोलापूर जिल्ह्यात यापूर्वीच जवळा येथे बूथ कमिटी तयार करण्यात आल्या होत्या. अशा बूथ कमिटीवरील महिलांना प्रदेश अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील, राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा जयमाला गायकवाड, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा अनिता नागणे, सुवर्णा बागल, दिपाली पांढरे, तालुका अध्यक्षा सखुबाई वाघमारे, जवळा गावच्या सरपंच अलकाताई घुले व जवळा परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 
रूपाली चाकणकर म्हणाल्या की, संपूर्ण महाराष्ट्रभर राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसची ताकद वाढवण्यासाठी बूथ कमिटी आढावा बैठकांच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून आम्ही फिरत आहोत. सांगोला शहर व तालुक्‍यात बुथ कमिटीने केलेल्या कार्याचा उल्लेख आपण आवर्जून राज्यभर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.  

संपादनः 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com