देशमुखांच्या "एसएमएस'कडे मुख्यमंत्र्यांचे दुर्लक्ष 

संतोष सिरसट 
बुधवार, 8 एप्रिल 2020

ठाकरे यांनी धारिष्ट्य दाखविले नाही 
आमदार सुभाष देशमुख यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना तीन "एसएमएस' पाठविले. मात्र, या तीनपैकी एकाही "एसएमएस'ला उत्तर देण्याचे धारिष्ट्य मुख्यमंत्री ठाकरे यांनी दाखविले नाही हे विशेष. 

सोलापूर ः देशासह राज्यात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. दररोज रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्या पार्श्‍वभूमीवर सोलापुरातील लोकांची सोय व्हावी. त्यांना अन्नधान्य मिळावे, यासाठी माजी सहकारमंत्री, आमदार सुभाष देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तीन "एसएमएस' पाठविले आहेत. मात्र, त्यापैकी एकाही "एसएमएस'ला मुख्यमंत्री ठाकरे यांनी उत्तर दिले नाही. 

प्रत्येक सामान्य कुटुंबाला तांदूळ आणि गहू पाच किलो द्यायचे ठरविले आहे. पण, त्याचे वाटप अद्यापही सुरू झालेले नाही. त्याबाबत आपण खालील यंत्रणांना सूचना देण्याबाबतचा पहिला "एसएमएस' श्री. देशमुख यांनी 1 एप्रिलला मुख्यमंत्री ठाकरे यांना केला. त्यावर ठाकरे यांनी काहीच उत्तर दिले नाही. त्यानंतर 2 एप्रिलला देशमुख यांनी दुसरा एसएमएस मुख्यमंत्र्यांना केला. त्यामध्ये देशमुख यांनी शिधापत्रिका असणाऱ्यांना धान्य मिळत नाही. त्यांची उपासमार होईल. त्यामुळे आपल्याला विनंती आहे की त्याबाबत सुद्धा तत्काळ निर्णय घेऊन परिपत्रक काढून संबंधितांना ते धान्य वाटप व्हावे ही विनंती केली होती. मात्र, त्यालाही काहीच उत्तर मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले नाही. तरीही जिद्दी असलेल्या आमदार देशमुख यांनी पुन्हा 7 एप्रिलला तिसरा "एसएमएस' मुख्यमंत्री ठाकरे यांना पाठविलाच. त्यामध्ये त्यांनी केसरी कार्डधारक व बिगर कार्डधारक यांना धान्यवाटप होत नसल्यामुळे उद्रेक वाढत आहे. त्यामुळे आपणाला विनंती आहे की केशरी कार्डधारक व बिगर कार्डधारकांना धान्य वाटप करण्याचे नियोजन करावे ही विनंती. असा एसएमएस केला होता. 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CM Thakare ignores Deshmukh's sms