कांदा निर्यातबंदीविरोधात माढ्यात कॉंग्रेस आक्रमक 

congress.png
congress.png

माढा (सोलापूर): माढा तालुका कॉंग्रेस कमेटीने केंद्र सरकारने केलेल्या कांदा निर्यात बंदीच्या विरोधात माढ्याच्या तहसीलदारांना निवेदन दिले असून निर्यातबंदी मागे न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. 

कॉंग्रेस पक्षाने कांदा निर्यात बंदीच्या विरोधात भूमिका घेतली आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी जाहीर केल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. संपूर्ण देशामध्ये कोरोनामुळे अर्थव्यवस्था डबघाईस आलेली असताना या निर्णयामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था व कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत आला आहे. केंद्र सरकारने सहा महिन्यात अशा प्रकारची कांदा निर्यात बंदी दोनदा लादल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. तसेच गेल्या पाच सहा महिन्यात कांद्याला बाजार भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही भरून निघणे मुश्‍किल झाले असताना ही निर्यातबंदी करून केंद्र सरकारने शेतकऱ्यांची कंबरडेच मोडले असल्याची भावना शेतकरी वर्गात आहे. कांदा निर्यातबंदीचा निर्णय मागे घेऊन शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी म्हणून कांदा निर्यात बंदीचा विरोध करत आहोत. केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. 

यावेळी संत कुर्मदास कारखान्याचे संचालक दादासाहेब साठे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष सौदागर जाधव, जिल्हा सरचिटणीस रामभाऊ वाघमारे, माजी नगराध्यक्ष राहुल लंकेश्वर, गंगाराम पवार, प्रभाकर जाधव, तालुका उपाध्यक्ष जहिर मणेर, युवक कॉंग्रेस जिल्हा उपाध्यक्ष शाहुराजे जगताप, निलेश बंडगर, नितीन साठे, प्रतापसिंह कदम, हमीद शिकलकर, आशोक पाटील, सचिन खैरे उपस्थित होते.  

संपादनः प्रकाश सनपूरकर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com