
अशा असणार समिती
या समितीमध्ये मा. मुख्य न्यायाधीश यांनी नामनिर्देशित केलेले उच्च न्यायालयाचे न्यायाधीश मा. न्यायमूर्ती के. के. तातेड यांची समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्य सचिवांनी नामनिर्देशित केलेले वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव आणि राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव हे या समितीचे सदस्य असणार आहेत. ही तीन जणांची समिती राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग व जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांच्या नियुक्तीसाठी सरकारला शिफारस करणार आहे.
सोलापूर : ग्राहक संरक्षण अधिनियम 2019 च्या अंतर्गत राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग व जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांच्या नियुक्तीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या नियुक्त्या करण्यासाठी राज्य शासनाला शिफारस करण्यासाठी निवड समिती गठीत करण्यात आली आहे.
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्यावतीने ही शिफारस समिती गठित करण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या ग्राहक संरक्षण कायद्यान्वये राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग व जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांची नेमणूक करणे आवश्यक आहे. या नेमणुका करण्यासाठी राज्य शासनाला शिफारस करण्यासाठी तीन सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली आहे.