PHOTOS : सोलापुरात "सोशल डिस्टंट'चे तीन तेरा 

विजयकुमार सोनवणे
शनिवार, 4 एप्रिल 2020

बाळीवेस चौकात "धुलाई' 
विनाकारण रस्त्यावर आलेल्या नागरिकांची पोलिसांनी बाळीवेस चौकात धुलाई केली. बाहेर पडण्याची कारणे विचारली असता थातुरमातून उत्तरे देण्यात आली. अशा सर्व वाहनधारकांना पोलिसांच्या लाठीचा प्रसाद मिळाला, शिवाय त्यांची वाहने जप्तही करण्यात आली. शहरातील प्रमुख रस्त्यावर किरकोळ कारणासाठी नागरिक रस्त्यावर होते, त्यामध्ये महिलांचे प्रमाणही उल्लेखनीय होते. 

सोलापूर : कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी किमान एक ते तीन मीटरचे अंतर ठेवण्याच्या सूचना शासनाकडून देण्यात आल्या आहेत. मात्र आज शनिवारी शहरातील बहुतांश बॅंकांच्या शाखेसमोर गर्दी उसळली. सामाजिक अंतर (सोशल डिस्टंट) कागदावरच राहिले. अनेक ठिकाणी नागरिकांनी पोलिसांशी हुज्जत घातली. काही बॅंकांनी ग्राहकांना सावलीत उभारता यावे यासाठी मंडप उभारले होते. मात्र तेही अपुरे पडले. विविध बॅंकांच्या ग्राहक सेवा केंद्रांवरही भल्या मोठ्या रांगा दिसून आल्या. 

प्रतिमेत याचा समावेश असू श्‍ाकतो: एक किंवा अधिक लोक, लोकं बसली आहेत, मोटारसायकल आणि बाहेरील
विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांना पोलिसांच्या लाठीचा प्रसाद मिळाला

सोलापूरकर अजुनही रस्त्यावरच.... 
रस्त्यावर येऊ नका, आपल्या घरातच बसा असे वारंवार आवाहन करूनही शनिवारी अनेक सोलापूरकर रस्त्यावर आले होते. संचारबंदीच्या कालावधीत दुध विक्रीला परवानगी आहे. मात्र त्याचा व्यवहार करताना सामाजिक अंतर ठेवणे आवश्‍यक आहे. मात्र त्या ठिकाणीही बाजार भरल्याप्रमाणे गर्दी करण्यात आली होती. सात रस्ता परिसरात रिक्षा रस्त्यावर धावत होत्या. या सर्व रिक्षा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. 

प्रतिमेत याचा समावेश असू श्‍ाकतो: ३ लोक, लोकं उभी आहेत, गर्दी, लग्न सोहळा, फ़ुल आणि बाहेरील
भाजी मंडईतही अशा पद्धतीने गर्दी होती 

भाजी मंडईतही गर्दी 
सोलापूर शहरातील प्रमुख भाजी मंडईही गर्दीने फुलून गेल्या होत्या. विशेषतः कस्तुरबा आणि राणी लक्ष्मीबाई मार्केटमध्ये सामाजिक अंतराचे पालन करण्यात आले नाही. खुल्या मैदानावर भरविण्यात आलेल्या मार्केटमध्येही गर्दी होती. मात्र त्या ठिकाणी विक्रेते आणि ग्राहकांनी अंतर ठेवत व्यवहार केले. रस्त्यावर विक्रीस बसलेल्यांनी मात्र कसलाच विचार केला नाही. 

प्रतिमेत याचा समावेश असू श्‍ाकतो: एक किंवा अधिक लोक आणि बाहेरील
बॅंकासमोर झालेली गर्दी 

प्रतिमेत याचा समावेश असू श्‍ाकतो: 1 व्‍यक्ती, गर्दी आणि बाहेरील
दूध विक्रीवेळी झालेल्या गर्दीचे  बोलके चित्र

प्रतिमेत याचा समावेश असू श्‍ाकतो: एक किंवा अधिक लोक, कार, झाड आणि बाहेरील
रस्त्यावर धावणाऱ्या रिक्षा जप्त करण्यात आल्या. (छायाचित्रे ः श्रीनिवास सादूल व प्रमोद हिप्परगी)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona carfew in solapur city