शहरात आढळले कोरोनाचे 31 नविन बाधित रुग्ण 

CORONA.JPG
CORONA.JPG

सोलापूर: शहरात गुरुवारी 855 संशयितांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 824 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले असून 31 कोरोनाचे रुग्ण मिळून आले तर एकाचा मृत्यू झाला. मिळून आलेल्या रुग्णांमध्ये 18 पुरुष तर 13 महिला आहेत. मरण पावलेली व्यक्ती ही 69 वर्षीय पुरुष असून ते गवळी वस्ती तालीमजवळ राहण्यास होते. शहरातील 422 कोरोना रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. 

शहरात आतापर्यंत 10 हजार 473 रुग्ण आढळून आले आहेत. गुरुवारी शहरात मुरारजी पेठ, रेल्वे लाईन्स (आनंद अपार्टंमेट), होटगी रोड (काडादी नगर), लक्ष्मी पेठ (शेटे नगर), होटगी रोड (किनारा हॉटेलजवळ), सात रस्ता (बी. एस. एन. एल. कार्यालयाजवळ), राजस्व नगर, शेळगी (महालक्ष्मी नगर), जोडभावी पेठ, सात रस्ता (शोभा नगर), भवानी पेठ, अवंती नगर (पद्मश्री अपार्टमेंट), बोळकोट नगर (व्यंकटेश नगर), जुळे सोलापूर (भिमा नगर), हत्तुरे वस्ती (लक्ष्मी नगर), कोंडा नगर, आरटीओ कार्यालय (साई रेसिडेन्सी), भवानी पेठ (सिध्देश्‍वर सोसायटी), मुरारजी पेठ (केदारनाथ रेसिडेन्सी), वसंत विहार (थोबडे नगर), रेल्वे लाईन्स (मरिआई चौकाजवळ), मोदी (शिवाजी नगर) या ठिकाणी रुग्ण मिळून आले. 

सोलापूर शहरात आतापर्यंत 564 रुग्ण मरण पावले असून त्यामध्ये 377 पुरूष व 187 महिलांचा समावेश आहे. तर 9 हजार 487 रुग्ण रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले आहेत. 2 डिसेंबर रोजी मिळालेल्या रुग्णांनुसार शहरातील कमर हॉलजवळ (नई जिंदगी), 87 पी चंद्रकला नगर (नई जिंदगी), प्लॉट नं. 14 सुमय्या नगर (नई जिंदगी), कस्टल अपार्टमेंट (रेल्वे लाईन, महापौर बंगल्यासमोर), विद्या नगर भाग 2 (पाथरुट चौक अमीन अपार्टमेंट), गहीनी अपार्टमेंट (उत्तर सदर बझार), ब्लॉक नं. 1/7 म्युनसिपल कॉलनी (सात रस्ता), घर नं. 40/7/2 सोनाहिरा चौक (बुधवार पेठ), घर नं. 64 (बेगम पेठ), घर नं. ई 24 श्रीशैल नगर (भवानी पेठ) हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहिर करण्यात आला आहे. 


ठळक बाबी...... 

आतापर्यत होम क्‍वारंटाईन झालेल्या व्यक्ती 28817. 
14 दिवसाचा कालावधी पूर्ण झालेल्या व्यक्‍ती 28701. 
गुरुवारी 116 जणांना होम क्‍वारंटाईन करण्यात आले. 
संस्थात्मक विलगीकरणात 14480 जण. 
14 दिवसाचा संस्थात्मक विलगीकरणाचा पूर्ण झालेल्या व्यक्ती 12527. 
संस्थात्मक विलगीकरण केलेल्या व्यक्ती 58. 
घरात विलगीकरण करण्यात आलेल्या व्यक्ती 42.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com